मिलिंद नार्वेकरांना देवेंद्र फडणवीस अन् शरद पवार यांचा पाठिंबा? एकत्र फोटोने चर्चेला उधाण


मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक मुंबई : राज्याच्या क्रिकेट विश्वातील अग्रगण्य संस्था म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या  (Mumbai Cricket Association MCA) निवडणुकांची रंगत दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशातच एमसीए निवडणुकीतील (MCA Election) कोर्टात प्रलंबित अंतिम उमेदवारांच्या यादीवरील आक्षेप प्रकरणासंदर्भात आज (7 नोव्हेंबर) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी पार पडणार आहे. तर दुसरीकडे एमसीए निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा देखील आजचा शेवटचा दिवस आहे.

या सर्वच्या पार्शवभूमीवर सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) सचिव आणि विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकरांच्या नावाला (Milind Narvkar) एमसीएच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचा पाठिंबा असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

Mumbai Cricket Association Election : मिलिंद नार्वेकर एमसीएच्या कार्यकारणीत असावे, उद्धव ठाकरेही आग्रही

मिलिंद नार्वेकर हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशातच निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यासोबतचे फोटो आता चर्चाचा विषय ठरले आहे. तर दुसरीकडे मिलिंद नार्वेकर एमसीएच्या कार्यकारणीत असावे यासाठी उद्धव ठाकरे हे सुद्धा आग्रही असल्याची माहिती आहे. दरम्यान यासाठी शरद पवार यांना उद्धव ठाकरेंni संपर्क साधल्याचीहे माहिती पुढे आली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी एमसीए अध्यक्ष पद, उपाध्यक्ष पद, सेक्रेटरी, खजिनदार, जॉईंट सेक्रेटरी एकूण सहा पदासाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळे एमसीए निवडणुकीत मिलिंद नार्वेकर यांना नेमकं कोणत्या पदासाठी या दोन बड्या नेत्यांचा पाठिंबा आहे? हे फक्त अद्याप कळू शकलेलं नाही.

Milind Narvkar : आपण अपेक्स बॉडी मेंबर, केलेल्या कामाचा दिला दाखला

मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या फोटो सोबत शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सोबतचे सुद्धा फोटो पोस्ट करत आपण अपेक्स बॉडी मेंबर असताना केलेल्या कामाचा दाखला दिला आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची मोर्चे बांधणी प्रारंभ असतानाही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नेमकं काय होतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदासाठी अजिंक्य नाईक, विहंग सरनाईक, प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, डायना एडलजी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.  येत्या 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) आणि भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी (Diana Edulji) या सुद्धा शर्यतीत आहेत. एडलजी या एकमेव प्रमुख क्रिकेटपटू उमेदवार आहेत. याशिवाय, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) यांनीही अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बहुरंगी झाली आहे.

हे देखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.