दिग्विजय पाटलांना जाणून बुजून टार्गेट केलंय; गृह खात्याची उलटी गिनती, एक टक्के भागीदार असलेल्या


पार्थ पवार जमीन घोटाळा पुणे : पुण्याच्या मुंढवा भागातील वादग्रस्त जमिन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांचे (Parth Pawar Pune Land Scam) मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. संगनमत करुन शासनाचा 5 कोटी 89 लाख 31 हजार आठशे रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या अन्य तिघांमध्ये या जागेची पॉवर ऑफ एटर्नी असलेल्या शितल तेजवानी आणि रविंद्र तारू यांचा समावेश आहे, मात्र दिग्विजय पाटलांचे (Digvijay Patil) व्यवसायिक भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जर एका व्यावसायिक भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरा भागिदार असलेल्या पार्थ यांच्यावर गुन्हा का नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील यांना जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे, असं दिग्विजय पाटील यांच्या वडिलांचे मित्र बिभीषण लोमटे यांनी म्हटलं आहे.

Parth Pawar Land Scam Pune: गृह खात्याने उलटी गिनती सुरू केली आहे का?

दिग्विजय पाटील यांचे कौटुंबिक स्नेही वडिलांचे मित्र बिभीषण लोमटे यांनी या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिली आहे. दिग्विजय पाटील यांना जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे. एक टक्के भागीदार असल्यावर गुन्हा दाखल होतो आणि बाकीच्या 99 टक्के असलेल्यांना सोडलं जातं. गृह खात्याने उलटी गिनती सुरू केली आहे का? वडील वारलेले आहेत त्याला कोणीही आधार नाही, गृहखात्याने त्यांच्या कुटुंबावर आघात केलाय हा कोणता प्रकार आहे. टार्गेट करताना छोट्याला टार्गेट केलं, शिकणाऱ्या मुलाला असं टार्गेट करू नका. दिग्विजय पाटील यांच्या वडिलांचे मित्र बिभीषण लोमटे यांनी याप्रकरणी भाष्य केलं आहे.

कोण आहेत दिग्विजय पाटील? (Who Is Digvijay Patil Land Scam)

१. धाराशिव जिल्ह्यातल्या तेर गावचे मूळचे रहिवासी…

2. पार्थ पवार यांचे मामा अमरसिंह पाटील यांचे दिग्विजय हे पुत्र…

3. दिग्विजय पाटील सध्या पुण्यात वास्तव्यास.

4. तेरमधली वडिलोपार्जित जमीन कसण्यासाठी, कौटुंबिक कार्यक्रम, मतदानासाठी जातात तेरला.

5. सध्या तेरामध्ये दिग्विजय पाटलांच्या कुटुंबातल्या कोणाचेही वास्तव्य नाही.

तिघांवर गुन्हे, आरोप काय? (Parth Pawar Land Scam)

1. शीतल तेजवाणी- जागेची पॉवर ऑफ एटर्नी असल्याचे सांगत जमीन विकली.

2. दिग्विजय पाटील- पार्थ पवारांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांनी मुद्रांक शुल्काचे पाच कोटी 89 लाख रुपये बुडवले.

3. रविंद्र तारु- नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी असूनही खरेदी-विक्रीवरचा 2 टक्के अधिभार आणि कर वसूल केला नाही.

नेमकं प्रकरण काय? (Pune Parth Pawar Land)
1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादस दानवे यांनी केला. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला असं अंबादास दानवे म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.