IPL 2026 पूर्वी संजू सॅमसनचा राजस्थान रॉयल्सशी निरोप होणार? DC सोबतच्या डीलवर मोठी अपडेट समोर

आयपीएल 2026 (IPL 2026) च्या आधी अनेक खेळाडू आपापल्या टीम बदलू शकतात. डिसेंबर 2025 मध्ये ऑक्शन होणार आहे आणि त्याआधीच संजू सॅमसनच्या (Sanju Samson) ट्रेडबद्दल अफवा पसरल्या होत्या. असे म्हटले जात होते की, त्याची दिल्ली कॅपिटल्ससोबत चर्चा झाली होती आणि करोडोंच्या करारात संजू DC मध्ये जाणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

त्याच वेळी राजस्थान रॉयल्समध्ये (Rajasthan royals) त्याच्या जागी ट्रिस्टन स्टब्सचा समावेश होईल, असेही सांगितले जात होते. मात्र आता या सगळ्यावरून एक वाईट बातमी समोर आली आहे, संजू सॅमसनचा दिल्ली कॅपिटल्ससोबतचा करोडोंचा करार कदाचित होणार नाही.

संजू सॅमसन अनेक वर्षांपासून राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. अशी चर्चा होती की पुढच्या IPL हंगामात तो दुसऱ्या टीममध्ये सामील होऊ शकतो. त्यात दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) नाव सर्वात पुढे होते. त्याशिवाय आणखी दोन संघही त्याला घेण्यात रस दाखवत होते. असेही सांगितले जात होते की, DC च्या ट्रिस्टन स्टब्ससोबत संजूचा ट्रेड होणार आहे. पण आता रिपोर्ट्सनुसार दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा ट्रेड बहुधा होणार नाही.

Comments are closed.