Asia Cup Trophy: बीसीसीआय विरुद्ध मोहसिन नक्वी आमनेसामने! आयसीसी अध्यक्ष जय शाह घेणार अंतिम निर्णय
टीम इंडियाने (Team india) आशिया कपचं (Asia Cup 2025) विजेतेपद आपल्या नावावर केलं होतं, पण त्यांना अजूनही ट्रॉफी मिळालेली नाही. पाकिस्तानचे गृह मंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) चे प्रमुख मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) हे भारतीय संघाला ती ट्रॉफी देऊ इच्छित होते. मात्र, भारतीय खेळाडूंनी त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने नक्वी ती ट्रॉफी स्वतःसोबत घेऊन गेले.
BCCIचे सचिव देवजीत सैकिया (Devjit Sakiya) यांनी स्पष्ट केलं होतं की, हा मुद्दा ते ICCच्या बैठकीत मांडणार आहेत आणि आज, म्हणजेच 7 नोव्हेंबर, त्या बैठकीचा शेवटचा दिवस आहे. पूर्वी अशी बातमी होती की, मोहसिन नक्वी या बैठकीत सहभागी होणार नाहीत, पण आता ते BCCIशी थेट आरपारची भूमिका घेण्यासाठी तयार आहेत. ट्रॉफीविषयीचा निर्णय आजच येण्याची शक्यता आहे.
मोहसिन नक्वी यांनी गेल्या काही ICC बैठका टाळल्या होत्या, त्यामुळे असे वाटत होते की, नोव्हेंबरमधील या बैठकीतही ते उपस्थित राहणार नाहीत. चर्चा अशी होती की, BCCI आशिया कप ट्रॉफी परत मिळवण्यासाठी जे पावले उचलणार आहे, त्यातून नक्वी मागे हटले आहेत. परंतु, क्रिकबजच्या रिपोर्ट्सनुसार, नक्वी दुबईत पोहोचले असून आज ट्रॉफीविषयीचा निर्णय निश्चितपणे घेतला जाऊ शकतो.
ICCचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) आहेत आणि बैठकीत ट्रॉफी विवादावर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. 7 नोव्हेंबर 2025 रोजी नक्वी बैठकीत सहभागी होणार असल्याने, BCCI ट्रॉफी परत मिळवण्याची आणि नक्वीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणार आहे. नक्वी आपली बाजू मांडतील, पण अंतिम निर्णय जय शाह आणि त्यांच्या समितीचा असेल.
टीम इंडियाने आशिया कप जिंकलेला असल्याने, ट्रॉफीवर त्यांचाच हक्क आहे. त्यामुळे ICC नक्वींकडून ती ट्रॉफी परत मागू शकते. जर नक्वी ICCच्या निर्णयाला साथ देत नसतील, तर त्यांना ACC संचालकपदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे. आशिया कप ट्रॉफीचं भविष्य काय ठरणार? याच निर्णयावर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत.
Comments are closed.