सतत चिडचिड होते? असू शकते या व्हिटॅमिनची कमतरता

हल्ली कामाचे प्रेशर, घराचे-गाडीचे EMI , वाढती महागाई यांसारख्या गोष्टींमुळे ताणतणावासोबत चिडचिड सुद्धा होते. कधीकधी तर साध्या साध्या गोष्टींमुळे चिडचिड होते. चिडचिडेपणा ही एक मानसिक स्थिती आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला राग, निराशा किंवा टेन्शन जाणवते. हे सहसा थकवा, ताण किंवा शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होते. कधीकधी ते मानसिक किंवा शारीरिक समस्येचे लक्षण असू शकते. तज्ज्ञांच्या मते सतत चिडचिड होणे सहसा आहार, ताण, हार्मोनल बदल, मानसिक विकार किंवा व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होते. आज आपण जाणून घेऊयात सतत चिडचिड होण्यामागे शरीरात कोणते व्हिटॅमिन कमतरता असते.

कारणीभूत व्हिटॅमिन्स –

व्हिटॅमिन बी कॉप्लेक्स आणि व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे चिडचिडेपणा वाढतो. हे व्हिटॅमिन्स शरीरात डोपामाइन आणि सरोटोनिनसारखे हार्मोन्स तयार करतात. हे हार्मोन्स मूड नियंत्रित करतात. या व्हिटॅमिन्सशिवाय व्हिटॅमिन सी आणि झिंक चिडचिड होण्याला कारण असू शकतात.

हेही वाचा – वर्कआउटनंतर लगेच गरम पाण्याची अंघोळ ठरू शकते घातक

उद्भवणाऱ्या समस्या –

चिडचिडेपणा हा बऱ्याचदा वाईट मूडशी संबंधित असतो. जसे की, राग येणे, ताणतणाव किंवा विनाकारण अस्वस्थ होणे. चिडचिडेपणामुळे तुम्ही इतरांवर चिडू लागता. यामुळे घाम येणे, हृदयाचे ठोके वाढणे, मळमळ होणे किंवा झोप पूर्ण न होणे अशा समस्या सुरू होतात.

यावर उपाय काय?

  • चिडचिड थांबवण्यासाठी संतुलित आहार घ्यावा. आहारातून शरीरात व्हिटॅमिन बी, डी, सी आणि झिंक मुबलक प्रमाणात कसे जातील याचा विचार करावा.
  • दररोज योग, ध्यान आणि पूर्ण झोप घ्यावी.
  • तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन बी सप्लीमेंट्स घेण्यास सुरूवात करावी.
  • मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी गाणे ऐकणे, पुस्तके वाचणे आदी प्रकार करू शकता.

हेही वाचा – रूम फ्रेशनरमुळे फक्त श्वसनाचे नाही तर होऊ शकतात हे आजार

Comments are closed.