भाजीत मीठ नेमकं केव्हा टाकावं ?
स्वयंपाक करणं ही एक कला असून या कलेत अचूक प्रमाण आणि वेळ याला विशेष महत्व आहे. योग्य वेळी य़ोग्य पदार्थ भाजीत पडला की त्या भाजीची चवच बदलते. हा नियम जेवढा मसाल्यांना लागू होतो त्यापेक्षा कैकपट अधिक तो मीठाला लागू होतो. कारण भाजी मीठ कमी पडले तर पदार्थ अळणी चवहीन होतो. पण तेच मीठ योग्य वेळी योग्य प्रमाणात वेगवेगळ्या पदार्थात टाकले तर पदार्थाची चव अफलातून होतो. त्यासाठी मीठ पदार्थात नेमके कोणत्या वेळी टाकावे हे समजून घेऊया.
सुकी भाजी
जर तुम्हाला सुकी भाजी बनवायची असेल तर भाजीला जीरे-मोहरीची, फोडणी घातल्यानंतर कांदा, टॉमेटो ,परतत असतानाच मीठ टाकावे. नंतर त्यात भाज्या टाकाव्यात. त्यामुळे भाजी लवकर शिजण्यास मदत होते. भाजी लवकर शिजते आणि चविष्टही होते.पण जर तुम्हाला भाजीमध्ये कुरकुरीतपणा हवा असेल प्रामुख्याने भेंडी. कारलं सारख्या भाज्यांमध्ये मीठ सगळ्यात शेवटी म्हणजे भाज्या शिजल्यावर टाकावे. त्यामुळे या भाज्यांमधील कुरकुरीतपणा टिकून राहतो.
पालेभाज्या
थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. यादिवसात बाजारात मुबलक प्रमाणावर हिरव्या फळभाज्या,पालेभाज्या सहज मिळतात. प्रामुख्याने यादिवसात पालक,मेथी, मोहरीची भाजी मिळते. या भाज्या बनवताना त्यांचा रंग आणि त्यातील पौष्टीक घटक टिकून राहण्यासाठी भाजी शिजून झाल्यानंतर सर्व करताना त्यात मीठ टाकावे. त्यामुळे पदार्थाची चव वाढते आणि रंगही फ्रेश दिसतो.
रोसा वनस्पती
आपल्याकडे रस्सा भाजी आवडीने खाल्ली जाते. प्रामुख्याने कुटुंब मोठ असेल तर अशावेळी पुरवठ्याची भाजी म्हणून आवर्जुन रस्साभाजी केली जात असे. पण या भाजीत मीठ केव्हा टाकल्याने भाजी चविष्ट होते हे देखील माहीत असायला हवे. आपल्याकडे रस्साभाजीसाठी कधी कांदा-खोबरं तर कधी टॉमेटो, कांद्याची प्युरी केली जाते. ही प्युरी किंवा कांदा-खोपऱ्याचं वाटप तेलात परतत असतानाच मीठ टाकावे. त्यामुळे मसाला , प्युरी लवकर तर शिजतेच शिवाय भाजीला सुंदर चव आणि रंगही येतो.
डाळ
आपल्याकडे काहीजण वरण किंवा आमटीसाठी डाळ शिजवतानाच त्यात मीठ टाकतात. पण ही चुकीची पद्धत असून डाळ शिजवतानाच त्यात मीठ घातल्यास त्यातील प्रोटीन्सची मात्रा कमी होते. त्यामुळ डाळीला फोडणी घातल्यानंतर ती परतत राहावी नंतर मीठ टाकावे. त्यामुळे डाळीची चव तर वाढतेच शिवाय त्यातील पोषक घटकही टिकून राहतात.
Comments are closed.