IND vs AUS: अभिषेक शर्माकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, फक्त हे काम कराव लागेल
भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा उत्तम फॉर्ममध्ये आहे. गेल्या वर्षी भारतासाठी टी-20 मध्ये पदार्पण केल्यापासून त्याने भरपूर धावा केल्या आहेत. तो लवकरच टी-20 मध्ये एक मोठा टप्पा गाठण्यासाठी सज्ज आहे. शर्माकडे सर्वात जलद 1000 टी-20 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. तो टी-20 मध्ये 1000 धावा पूर्ण करण्यापासून फक्त 11 धावा दूर आहे.
जर अभिषेक शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 मध्ये 11 धावा केल्या तर तो केवळ 1000 टी-20 धावा पूर्ण करणार नाही तर डावांच्या बाबतीत 1000 टी-20 धावा पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय खेळाडू बनेल. विराट कोहलीने 27 डावांमध्ये ही कामगिरी केली. केएल राहुलने 29, सूर्यकुमार यादवने 31 आणि अभिषेककडे 28 डावांमध्ये ही कामगिरी करण्याची सुवर्णसंधी आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सर्वात जलद 1000 धावा (डावांच्या बाबतीत) करण्याचा विक्रम डेव्हिड मलानच्या नावावर आहे. मलानने 24 डावांमध्ये ही कामगिरी केली. चेंडूंच्या बाबतीत सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या टिम डेव्हिडच्या नावावर आहे. त्याने 569 चेंडूंमध्ये ही कामगिरी केली. अभिषेकने 521 चेंडूंमध्ये 989 धावा केल्या आहेत. अभिषेककडे अजूनही टिम डेव्हिडला मागे टाकण्यासाठी भरपूर चेंडू आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सध्याच्या टी-20 मालिकेत अभिषेक शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने चार सामन्यांमध्ये 35च्या सरासरीने 140 धावा केल्या आहेत. शुबमन गिल 103 धावांसह दुसऱ्या आणि टिम डेव्हिड 89 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने गेल्या 17 वर्षांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका न गमावण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. आता पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ या दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न करेल.
Comments are closed.