Weight Loss : वेटलॉसच्या औषधांमुळे अवयव निकामी होण्याचा धोका
अपुरी झोप, पोषकतत्वांची कमतरता आणि व्यायामाचा अभाव यामुळे वजन वाढीची समस्या जवळपास सर्वांना भेडसावत आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोणी जीम, कोणी डाएट तर अगदीच कोणी वेट लॉसच्या गोळ्या घेत आहेत. तुम्ही सुद्धा वेट लॉससाठी गोळ्या किंवा पावडर घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण एका रिसर्चनुसार झटपट वजन कमी करणारे हे प्रॉडक्ट तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. इतकंच काय तर यामुळे एखादा अवयवही कायमचा खराब होऊ शकतो. चला जाणून घेऊयात वेटलॉसच्या औषधांमुळे शरीरावर काय परिणाम होतो.
पोटाच्या समस्या – वजन कमी करण्याच्या औषधांमध्ये फॅट ब्लॉकर्स आढळतात. या ब्लॉकर्समुळे अपचन, उलट्या, पोट फुगणे आणि पोटदुखीची समस्या सुरू होते. जर तुम्ही नियमित याचे सेवन केलेत तर पोटाच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होतो.
चयापचय – या औषधांचे अधिककाळ सेवन केल्याने चयापचय बिघडते. परिणामी, वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.
हेही वाचा – सतत चिडचिड होते? असू शकते या व्हिटॅमिनची कमतरता
किडनी स्टोन – वेट लॉस गोळ्यांचे सेवन केल्याने किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. आतड्यांमध्ये ऑक्सॅलिक ऍसिड जमा झाल्यामुळे मूत्राशयात दगड तयार होण्याची प्रक्रिया देखील सुरू होऊ शकते. त्यामुळे आधीच मूत्रपिंडाचा त्रास असलेल्या व्यक्तीने अशी औषधे टाळावीत.
यकृत – एका संशोधनानुसार, वजन कमी करण्याची औषधे किंवा कोणत्याही प्रकारच्या सप्लिमेंट्समुळे तुमच्या यकृतामध्ये सूज येऊ शकते.
यामुळे जर तुम्ही वेट लॉसच्या प्रयत्नात असाल तर वेट लॉस गोळ्या औषधांचा शॉर्टकट न वापरता व्यायाम आणि सकस आहार घेऊन नैसर्गिकरित्या वजन कमी करावे.
हेही वाचा – खजुराच्या बिया आहेत Energy Booster, जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत
Comments are closed.