वर्षानुवर्षे सोबत असलेल्या सहकाऱ्याने भास्कर जाधवांचा विश्वासघात केला, गुप्तपणे उदय सामंतांना ज


भास्कर जाधव: रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटात (Shiv Sena UBT) मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे चिपळूण तालुका उपप्रमुख जितेंद्र चव्हाण (jitendra Chavan) यांनी उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांची भेट घेतली आहे. ही भेट ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून त्यांनी जितेंद्र चव्हाण यांची पक्षातून थेट हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे.

भास्कर जाधव आणि जितेंद्र चव्हाण हे दोघे दीर्घकाळ एकत्र राजकीय काम करणारे म्हणून ओळखले जातात. चव्हाण हे जाधव यांचे विश्वासू आणि अत्यंत जवळचे सहकारी मानले जात होते. मात्र, उदय सामंत यांची भेट घेतल्याने भास्कर जाधव यांच्या मनात तीव्र नाराजी निर्माण झाली. यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत भास्कर जाधव यांनी जितेंद्र चव्हाण यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी केली.

भास्कर जाधव: वास्कर जाधवन्ना मोब्स मिशन

दरम्यान, रामपूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी न मिळाल्यामुळे जितेंद्र चव्हाण नाराज होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या नाराजीतूनच त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, चव्हाण शिंदे गटात प्रवेश करणार का? याबद्दलही तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांच्या मुलावर गुन्हा दाखल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांच्यावर लोटे एमआयडीसी परिसरात दादागिरी आणि मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. विक्रांत जाधव यांनी युवा सेनेच्या उपजिल्हा प्रमुखाला शिवीगाळ करून मारहाण केली, अशी तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. मारहाण झालेली व्यक्ती ही राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे कार्यकर्ते असल्याचे समजते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यात विक्रांत जाधव आणि संबंधित कार्यकर्त्यामध्ये तीव्र वाद होताना दिसतो. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीमधील बांधकाम ठेक्याच्या वादातून ही मारहाण झाली. वादाच्या दरम्यान विक्रांत जाधव यांनी समोरच्या व्यक्तीस “तुझ्यावर हात उचलला आहे, परतही उचलीन; तुमचा मंत्री आहे म्हणून वाटेल ते करणार का?” असा जाब विचारल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर पीडित कार्यकर्त्याने खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, त्या तक्रारीवरून विक्रांत जाधव यांच्यासह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आणखी वाचा

Narayan Rane: …तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी आम्ही संबंध तोडू; नारायण राणेंचा थेट इशारा, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.