Saree Reuse Idea : जुनी साडी फेकून देताय? या युक्त्या वापरुन करा काठाचा पुनर्वापर

प्रत्येक महिलेकडे साड्यांचे विविध कलेक्शन असते. यातील हेवी डिझायनर, पैठणी, कांजीवरमसारख्या साड्या या विशेष प्रसंगी नेसल्या जातात. काही वर्षानंतर साड्यांची चमक कमी होऊ लागते. साड्यांची चमक कमी दिसू लागल्याने या साड्या फेकण्यासाठी काढल्या जातात किंवा गरजूला देण्यात येतात. अशा परिस्थितीत स्मार्ट युक्त्या वापरून तुम्ही या साड्यांचे काठपदर पुन्हा वापरू शकता. कोणत्याही आउटफिटला बॉर्डर स्टिच करून तुम्ही नवा लूक देऊ शकता किंवा एखादी ऍक्सेसरीज बनवू शकता. चला जाणून घेऊयात साडीचे काठपदर खरेदी करण्यासाठी स्मार्ट युक्त्या वापरू शकता.

लेहेंग्यासाठी बॉर्डर –

हलक्या वजनाचा स्कर्ट किंवा लेहेंगा शिवत असाल तर त्यासाठी जुन्या साडीचा काठ वापरता येईल. तुम्ही कॉन्ट्रास्ट रंगाचा वापर केलात तर तुम्हाला ट्रेंडिंग लूक मिळेल. याशिवाय साडीचे काठ लेहेंग्याच्या मधोमध लांब पट्टीसारखे वापरू शकता.

हेही वाचा – Makeup Tips : मॅट लूकसाठी ब्लरिंग मेकअपचा ट्रेंड, जाणून घ्या कसा करतात?

ओढणीची बॉर्डर –

प्रतिमा स्त्रोत – गुगल

ओढणीला हेवी लूक द्यायचा असेल तर कोणत्याही जुन्या साडीचा काठ ओढणीला लावू शकता. फक्त सिल्कच्या साडीला सिल्क काठच वापरा,जेणेकरून ते विचित्र दिसणार नाही. याशिवाय रंगाची निवड सुद्धा योग्य करावी. लालसह हिरवा, जांभळ्यासह गुलाबी, निळ्यासह हिरवा असे रंग निवडावेत.

पट्टा –

प्रतिमा स्त्रोत – गुगल

हल्ली साडीसोबत बेल्ट घालण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे साडीच्या काठापासून बेल्ट बनवू शकता. मोठ्या काठपदराच्या साड्या यासाठी उपयुक्त ठरतात.

ब्लाउजसाठी बॉर्डर –

प्रतिमा स्त्रोत – गुगल

जुन्या साडीचे काठ तुम्ही ब्लाउजच्या स्लीव्हवर किंवा बस्ट लाइनवर लावू शकता. नेकलाईनला लावणे हा सुद्धा उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा – Hair Care: हेअर ट्रान्सप्लांटची गरज नेमकी केव्हा भासते? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Comments are closed.