युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक, पण भाजपकडून कोणतही निमंत्रण नाही, काय म्हणाले शंभूराज देसाई?
शंभूराज देसाई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना सुरुवात केली आहे. बैठकांसह गाठीभेटी सुरु केल्या आहेत. सातारा जिल्ह्यात देखील घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, या निवडणुकीत महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, मात्र भाजपकडून अद्याप कोणताही निमंत्रण आलेले नसल्याची प्रतिक्रिया साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
युती करण्याबाबत आमचे प्रयत्न सुरु
भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी युती करण्याबाबत मित्र पक्षांना निमंत्रण दिलेले आहे. मात्र अजून प्रतिसाद आला नाही अशी प्रतिक्रिया भोसले यांनी दिली. यावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मागील आठवड्यापूर्वी निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील तिन्ही पक्षांची जिल्ह्यात बैठक झाली. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले स्वतः मी शंभूराज देसाई आणि खासदार नितीन पाटील आमदार महेश शिंदे उपस्थित होते. मात्र भाजपाचे दोन्ही मंत्री उपस्थित नसल्यामुळे ही बैठक पुन्हा घेऊ असं जिल्हाध्यक्ष यांनी सांगितलं होतं असे देसाई म्हणाले. अद्यापही पुढील बैठकीबाबत आम्हाला निमंत्रण मिळालेल नाही. युती करण्याबाबत आमचे प्रयत्न सुरु आहेत असे शंबूराज देसाई म्हणाले. भाजपकडून कोणताही निरोप आमच्यापर्यंत आलेला नाही अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्राथमिक चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत
आमची तयारी सुरु आहे. आमचा युती करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्राथमिक चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. अद्याप जागांच्या बाबत चर्चा झालेली नाही असेही शंभूराज देसाई म्हणाले. सातारा जिल्ह्याती युती करण्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याची माहिती देखील शंभूराज देसाई यांनी दिली आहे. त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की वेगळं लढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पार्थ पवार प्रकरणाबाबत देखील शंभूराज देसाई यांनी विचारण्यात आले. यावर बोलताना देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती गठीत केली आहे. या चौकशीनंतर जे काही स्पष्ट होईल. तो सर्वांचा निर्णय राहील असेही शंभूराज देसाई म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Shambhuraj Desai : पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद? शरद पवारांच्या आरोपावर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
आणखी वाचा
Comments are closed.