दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा दिलासा! मॅचविनर खेळाडू मैदानात परतणार

भारत A आणि दक्षिण आफ्रिका A (India A vs South Africa A) यांच्यातील दुसरा अनऑफिशियल कसोटी सामना 6 नोव्हेंबरपासून सुरू आहे. या सामन्यात भारताच्या संघाकडून सर्वांचं लक्ष ऋषभ पंतकडे (Rishbh Pant) होतं, कारण तो इंडिया A संघाचा कर्णधार आहे. मात्र, पंत दुसऱ्या डावात खेळताना जखमी झाला आणि त्याला मैदान सोडावं लागलं. त्याला तीन वेगवेगळ्या ठिकाणी दुखापत झाली, पण शेवटची दुखापत थोडी गंभीर होती. त्यामुळे त्याला थोडा वेळ मैदानाबाहेर राहावं लागलं. पण काही वेळातच टीम इंडियासाठी एक चांगली बाब समोर आली.

अनऑफिशियल मालिकेनंतर भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे पंतचं फिट राहणं खूप महत्त्वाचं आहे. दक्षिण आफ्रिका A विरुद्ध खेळताना तो जखमी झाला असला तरी, त्याने नंतर पुन्हा मैदानात परत येत शानदार खेळी केली आणि अर्धशतक ठोकलं. साउथ आफ्रिका कसोटी मालिकेच्या आधी पंत पुन्हा मैदानात उतरल्याने भारतीय संघासाठी ही अतिशय चांगली बाब आहे.

पंतला पहिली दुखापत डोक्यावर झाली, जेव्हा त्याने रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्यांदा पुल शॉट खेळताना त्याच्या हाताला मार लागला, आणि शेवटची दुखापत पोटावर झाली, ज्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. तो जेव्हा मैदानाबाहेर गेला, तेव्हा तो 22 चेंडूंमध्ये 17 धावा करून खेळत होता. पण नंतर पुन्हा मैदानात परत येत त्याने 54 चेंडूंमध्ये 65 धावांची झळाळती खेळी केली. त्याने आपल्या डावात 5 चौकार आणि 4 षटकार ठोकले.

Comments are closed.