IND vs AUS: जगात कोणीही न करू शकलेली कामगिरी अभिषेक आणि गिलने करून दाखवली! रचला मोठा इतिहास
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. या मालिकेचा शेवटचा सामना 8 नोव्हेंबरला ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर पार पडला. मात्र, पावसामुळे सामना रद्द करण्यात आला आणि भारताने मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. शेवटच्या सामन्यात भारतीय संघ केवळ 4.5 षटकं फलंदाजी करू शकला. या दरम्यान अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल (Shubman gill) यांनी मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध, ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर, टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करणारे फलंदाज ठरले आहेत. या दोघांनी मिळून मालिकेत 188 धावांची भागीदारी केली.
याआधी हा विक्रम डेवाल्ड ब्रेविस आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्या नावावर होता, ज्यांनी 2025 साली 187 धावांची भागीदारी केली होती.
तसेच 2016 साली शिखर धवन आणि रोहित शर्मानेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध 183 धावांची भागीदारी केली होती.
पाचव्या सामन्यात भारताने 4.5 षटकांत विनाविकेट 52 धावा केल्या होत्या. अभिषेक शर्मा 13 चेंडूंमध्ये 23 धावा करत होता, तर शुबमन गिल 16 चेंडूंमध्ये 29 धावा करून खेळत होता. याच दरम्यान पाऊस आला आणि नंतर सामना रद्द करण्यात आला.
भारतीय संघाने संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली.
पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. यानंतर भारताने दमदार पुनरागमन करत तिसरा आणि चौथा सामना जिंकला. पाचवा टी-20 सामना रद्द झाल्यामुळे भारताने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली.
अभिषेक शर्माला मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू (Player of the Series) घोषित करण्यात आलं.
आता भारतीय संघ पुढील टी-20 मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.
Comments are closed.