आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले…


दुबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दुबईत आयसीसीच्या बैठकीनंतर पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर त्यांनी पीटीआयसोबत बोलताना म्हटलं की भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आशिया कप ट्रॉफीसंदर्भातील वाद दूर करण्यात यशस्वी ठरले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये यावर योग्य मार्ग काढण्यासाठी काम केलं जाईल.

Asia Cup Trophy Issue : नक्वी अन् सैकियांची बैठक, आशिया कप ट्रॉफीचा तिढा सूटणार

मोहसीन नक्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असून ते आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत. याशिवाय मोहसीन नक्वी पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत. भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानच्या भारत विरोधी भूमिकेमुळं मोहसीन नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन देखील भारतीय खेळाडूंनी करणं टाळलं होतं. आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केलं होतं. आशिया कप ट्रॉफीच्या फायलनमध्ये भारतानं 5 विकेटनं विजय मिळवला होता.

सैकिया यांनी शनिवारी पीटीआयसोबत बोलताना म्हटलं की ते आयसीसीच्या औपचारिक आणि अनौपचारिक बैठकीमध्ये सभागी होती. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी देखील उपस्थित होते. अधिकृत बैठकीच्या अजेंड्यावर आशिया कप ट्रॉफीचा विषय नव्हता. मात्र, आय़सीसीनं त्यांच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यासोबत, इतर अधिकाऱ्याच्या उपस्थितीत पीसीबीच्या अध्यक्षांसह वेगळी बैठक घडवून आणली.

सैकिया म्हणाले, चर्चेची प्रक्रिया सुरु होणं चागंलं आहे. दोन्ही पक्षांनी आयसीसीच्या बैठकीत सामंजस्यानं भाग घेतला. सैकियांनी पुढं म्हटलं की लवकरच योग्य मार्ग काढला जाईल. आशिया कपची ट्रॉफी सध्या दुबईतील आशियाई क्रिकेट परिषदेच्या मुख्यालयात असून नक्वींनी कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत की त्यांच्या परवानगीशिवाय ट्रॉफी कुठं घेऊन जाऊ नये.

मोहसीन नक्वी म्हणाले  की भारताला ट्रॉफी त्यांच्याकडून स्वीकारावी लागेल. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले, दोन्ही बोर्ड हा वाद लवकरात लवकर सोडवण्यासाठी काही तरी करतील. आता अडचणी दूर झाल्या आहेत. विविध पर्यायांवर काम केलं जात आहे.सैकिया म्हणाले, दुसऱ्या पक्षाकडे देखील पर्याय असतील आम्ही हा मुद्दा सोडवण्यासाठी सामंजस्यानं मार्ग काढण्यासाठी पर्याय देऊ.

भारतीय क्रिकेट संघानं आशिया कपची ट्रॉफी जिंकल्यानंतर मोहसीन नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळं भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन टाळलं होतं. भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने आले होते. त्यामध्ये देखील वाद  झाले होते. पाकिस्तानच्या हॅरिस राऊफवर दोन सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीनं घेतला. तर, सूर्यकुमार यादवला मॅच फीच्या 30 टक्के दंड करण्यात आला.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.