अजित पवार गटात अंतर्गत कलह पेटला! नोटीस मिळूनही रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक, चाकणकरांचा राजीनामा हवाच

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात अंतर्गत कलह पेटला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील-ठोंबरे यांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली असून सात दिवसांत खुलासा द्यावा, असा आदेश देण्यात आला आहे. या नोटीसनंतरही रुपाली ठोंबरेंनी आक्रमक पवित्रा कायम ठेवत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा अशी दुहेरी जबाबदारी चाकणकर यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठोंबरे यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांना नोटीस बजावली आहे.

नोटीस नव्हे, हे खुलासा पत्र

पक्षाने मला नोटीस नाही, तर खुलासा पत्र दिले आहे. मी कायदेशीर उत्तर देणार आहे आणि सर्व पुरावे सादर करणार आहे. माझ्याविरोधात समाजमाध्यमांवर खोटया पोस्ट टाकल्या गेल्या. त्या व्यक्तींचा महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्याशी संबंध आहे. हे पुरावे मी अजित पवार आणि सुनील तटकरे यांना देणार आहे, असे पाटील ठोंबरे यांनी सांगितले.

Comments are closed.