भारताच्या स्टार्सना सुट्टीच नाही! गाबाहून थेट कोलकात्यात विमान लँड; गिल-बुमराहची धावपळ, कधीपासू


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: शनिवार 8 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या निकालामुळे टीम इंडियाने मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली. मात्र या विजयाचा आनंद साजरा करण्यास भारतीय खेळाडूंना एक दिवसाचाही वेळ मिळाला नाही. पीटीआयच्या माहितीनुसार, रविवारी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह हे थेट ब्रिस्बेन गाबाहून कोलकात्यास रवाना झाले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर रंगणार आहे.

कधीपासून सुरू होणार कसोटी मालिका?

दक्षिण आफ्रिका संघही रविवारीच कोलकात्यात दाखल होणार असून, इतर भारतीय खेळाडू सोमवारपासून येणार आहेत. भारतीय संघ मंगळवारपासून कसोटी मालिकेची तयारी सुरू करेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिली कसोटी 14 नोव्हेंबरपासून कोलकात्यात, तर दुसरी 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीत होईल. सध्या विद्यमान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन असलेला दक्षिण आफ्रिका संघ नुकतीच पाकिस्तानविरुद्धची मालिका 1-1 अशी ड्रॉ करून भारत दौर्‍यावर आला आहे.

दुसरीकडे, टीम इंडियाने 2025-2027 जागतिक कसोटी अजिंक्यपद या चक्रातील पहिली मालिका इंग्लंडविरुद्ध खेळली होती. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर 2-2 ने ड्रॉवर रोखले होते.

भारत आणि दक्षिण आफ्रिकाचा रेकॉर्ड

आतापर्यंत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 44 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी 16 वेळा भारताने विजय मिळवला आहे, तर दक्षिण आफ्रिका 18 सामन्यांमध्ये विजयी ठरला आहे. 10 सामने अनिर्णीत राहिले आहेत. मागील चार कसोट्यांपैकी तीन वेळा दक्षिण आफ्रिकेने भारतावर मात केली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा कसोटी संघ- (India Test Squad vs South Africa 2025 Test)

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.

भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs SA Schedule)

  • पहिली कसोटी: 14-18 नोव्हेंबर (ईडन गार्डन्स)
  • दुसरी कसोटी: 22-26 नोव्हेंबर (एसीए स्टेडियम)
  • पहिला एकदिवसीय सामना: 30 नोव्हेंबर (जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम)
  • दुसरा एकदिवसीय सामना: 3 डिसेंबर (शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम)
  • तिसरा एकदिवसीय सामना: 6 डिसेंबर (एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम)
  • पहिली टी-20: 9 डिसेंबर (बारबती स्टेडियम, कटक)
  • दुसरा T20: 11 डिसेंबर (PCA स्टेडियम)
  • तिसरा T20: 14 डिसेंबर (HPCA स्टेडियम)
  • चौथी टी-20: 17 डिसेंबर (एकाना स्टेडियम)
  • पाचवी टी-20: 19 डिसेंबर (नरेंद्र मोदी स्टेडियम)

हे ही वाचा –

India A vs South Africa A, 2nd Unofficial Test : ऋषभ पंतला मानलं, दुखापत होऊनही पुन्हा मैदानात उतरला अन् आफ्रिकेच्या गोलंदाजांना धू धू धुतलं, समोर ठेवले इतक्या धावांचे लक्ष्य

आणखी वाचा

Comments are closed.