टाकावू वस्तूंपासून बनवा होम डेकोर

आपलं घर आकर्षक आणि सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी आपण घराला आकर्षक रंग देतो, सजवतो. सजवणे ही कला जरी असली तरी त्यात कल्पकता असणेही गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकवेळी बाजारातून महागडे रेडीमेड शो पीसच आणायला हवेत असे नाही. तर आपण घरातील काही टाकावू वस्तूंपासूनही शो पीस बनवू शकता.

नुकतीच दिवाळी झाली आहे. दिवाळीला जर तुम्हाला गिफ्ट विविध प्रकारचे मिठाईचे बॉक्स, डबे, बॉटल्स, ट्रे मिळाले असतील तर ते फेकून देऊ नका. तुम्ही त्याचा वापर शो पीस म्हणून करू शकता.

मिठाईच्या डब्याचा वापर तुम्ही शो पीस म्हणून करू शकता. त्यासाठी बॉक्सच्या चारही बाजूला वेलवेट पेपर लावून तुम्ही त्याचा ट्रे म्हणून वापर करू शकता.

तर आयताकृती बॉक्सचा वापर पेन हॉल्डर म्हणून करू शकता..मुलांच्या स्टडी टेबलवर हा बॉक्स ठेवू शकता.

जर तुमच्याकडे लाकडाचा बॉक्स असेल तर त्याचा वापर कुंडी, फुले ठेवण्यासाठी होऊ शकतो.

जर विविध रंगाच्या पेयाच्या रिकाम्या बाटल्या तुमच्याकडे असतील तर त्याचा उपयोग तुम्ही वॉल हँगिग साठी करू शकता. त्यासाठी त्यावर गोल्डन रंगाच्या टिकल्या चिकटवा. या बाटल्या तुम्ही गार्डन , बाल्कनीमध्ये लटकवू शकता.

Comments are closed.