ध्रुव जुरेलचे सलग दुसरे शतक! हिंदुस्थान ‘अ’ दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध विजयाच्या उंबरठ्यावर

जबरदस्त फॉर्मात असलेला यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने शनिवारी दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या चारदिवसीय क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवशी शानदार शतक ठोकले. त्याच्या या शतकाने हिंदुस्थान ‘अ’ संघ मजबूत स्थितीत पोहोचलाय. दुसऱ्या डावात सलग दुसरे शतक झळकावत जुरेलने हिंदुस्थानी कसोटी संघात स्थान मिळवण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे.
दुसऱ्या दिवसाच्या ३ बाद ७८ धावसंख्येवरून हिंदुस्थान ‘अ’ संघाने शनिवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. लोकेश राहुल (२७) व कुलदीप यादव (१६) ही दुसऱ्या दिवसाची नाबाद जोडी आज लवकर बाद झाली. त्यानंतर ध्रुव जुरेलने नाबाद १२७ धावा करत अभिषेक शर्मा (८४) सोबत १८४ धावांची भागीदारी केली. हिंदुस्थान ‘अ’ संघाने आपला दुसरा डाव ७ बाद ३८२ धावांवर घोषित करून दक्षिण आफ्रिकेसमोर ३९२ धावांचे आव्हान ठेवले. पहिल्या डावात २५ धावांनी पिछाडीवर राहिलेल्या आफ्रिकन संघास विजयासाठी आता मोठे लक्ष्य गाठावे लागणार आहे. प्रत्युत्तरादाखल उर्वरित ११ षटकांच्या खेळात पाहुण्या संघाने बिनबाद २५ धावांपर्यंत मजल मारली होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा जॉर्डन हेरमन १५, तर लेसेगो सेनोक्वेन ९ धावांवर खेळत होते.
पहिल्या कसोटीत ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडलेल्या जुरेलने या सामन्यात पुन्हा आपले कौशल्य सिद्ध केले. पंत जखमी झाल्यामुळे जुरेलला पुन्हा संघात संधी मिळाली आणि त्याने ती दोन्ही हातांनी साधली. पहिल्या डावात नाबाद १३२ धावा करणाऱ्या जुरेलने दुसऱ्या डावातही आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी केली. त्याने चौकार-षटकारांसह आक्रमक आणि नियंत्रणात खेळ दाखवत दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. त्याच्यासोबत द्रष्टेपणाने फलंदाजी करणाऱ्या दुबेनंही ७६ धावा केल्या. दुबे बाद झाल्यानंतर सुरुवातीच्या सत्रात रिटायर्ड हर्ट झालेला कर्णधार ऋषभ पंत पुन्हा फलंदाजीला आला. त्याने ५४ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६५ धावांची खेळी केली. जुरेलने आपल्या डावात अचूक कट, ड्राइव्ह आणि फ्लिक्सचे अप्रतिम फटके मारले. त्याने ८३ चेंडूंत अर्धशतक आणि १५९ चेंडूंत शतक पूर्ण केले. पंत बाद झाल्यानंतर हिंदुस्थानने डाव घोषित केला.

Comments are closed.