प्रक्षाळपूजेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट

प्रक्षाळपूजेनिमित्त आज (रविवार) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.

सजावटीमुळे मुळे श्रींचा गाभारा मनमोहक व आकर्षक दिसत आहे. यासाठी पिवळा गोंडा 200 किलो , लाल गोंडा 200 किलो, पांढरी शेवंती 200 किलो, अशोक पाला 100 लडी , कलर गुलाब 300 बंडल , ओर्केट 40 बंडल, अँथेरियम 100 काडी, शेवंती 1500 काडी, सॉंग 25, ड्रेस ना 25, टेबल पॉम 25, रामबाण 40 बंडल, मोच्या 20 बंडल, कारनेशन 150 बंडल इत्यादी दोन टन फुलाचा वापर करण्यात आला आहे. सदरची सजावट विठ्ठल भक्त अमोल शेरे, पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली आहे.

Comments are closed.