ज्या खेळासाठी सर्वस्व दिलं त्याच खेळाने जीव घेतला, या क्रिकेटपटूंचा मैदानावरच अंत झाला, टीम इंडियाच्या एका खेळाडूचाही समावेश

ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज फिलिप ह्यूज हा क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार मानला जात होता. पण एका बाउंसरने त्याचं आयुष्यच संपवलं. एका सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज शॉन एबटचा चेंडू त्याच्या मानेखालील भागावर बसला, ज्यामुळे मेंदूला गंभीर दुखापत झाली. दोन दिवसांनी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हेल्मेटचे डिझाईन बदलले गेले, विशेषतः मानेच्या सुरक्षेसाठी. “63 नॉट आउट” हा त्याचा स्कोअर आजही श्रद्धांजली म्हणून आठवला जातो.

भारताचा माजी फलंदाज रमन लांबा बांगलादेशात स्थानिक लीग खेळत होता. त्याने शॉर्ट लेगवर हेल्मेट न घालता क्षेत्ररक्षण केलं. फलंदाज मेहराब हुसेनच्या फटक्याने चेंडू थेट त्याच्या डोक्यावर आदळला. सुरुवातीला तो स्वतः चालत बाहेर आला, पण काही तासांनी कोमात गेला आणि तीन दिवसांनी निधन झाले. या घटनेनंतर जगभरात क्लोज-इन फील्डर्ससाठी हेल्मेट बंधनकारक करण्यात आलं.

इंग्लंडचे विल्फ स्लॅक 1989 मध्ये गांबियातील एका स्थानिक सामन्यात मैदानावर कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. या आधीसी स्लॅक चारवेळा बेशुद्ध पडले होते. शेवटपर्यंत डॉक्टरांना स्लॅकच्या मृत्यूचं कारण समजले नाही. डॉक्टरांनी सांगितलं की त्याला यापूर्वीही काही वेळा अशा प्रकारचे ब्लॅकआउट झाले होते, पण कारण सापडलं नाही. वयाच्या 34 व्या वर्षी स्लॅक यांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू वसीम राजा इंग्लंडमध्ये एक वेटरन्स सामना खेळत असताना मैदानावरच हार्ट अटॅकने कोसळला आणि काही मिनिटांतच निधन झाले. या घटनेनंतर वयोवृद्ध खेळाडूंकरिता कार्डियाक तपासण्या आणि फिटनेस चाचण्या अधिक काटेकोरपणे केल्या जाऊ लागल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या प्रथम श्रेणी क्रिकेटपटू डॅरिन रँडल एक बाउंसर पुल शॉट खेळताना, चेंडू त्याच्या डोक्यावर आदळला. तो मैदानातच बेशुद्ध पडला. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टर त्याला वाचवू शकले नव्हते.

झुल्फिकार भट्टी हा पाकिस्तानचा क्लब क्रिकेटपटू होता. पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना बाउन्सर चेंडू छातीवर आदळल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चेस्ट गार्ड्सच्या वापरावर भर दिला जाऊ लागला.

इयान फॉली या इंग्लिश क्रिकेटपटूचेही मैदानात खेळताना झालेल्या दुखापतीनंतर निधन झाले होते. सामन्यादरम्यान, फलंदाजी करताना डोळ्याखाली चेंडू लागला होता. दुखापतीनंतर रुग्णालयात दाखल केल्यावर शस्त्रक्रियेदरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले.  या घटनेनंतर प्रत्येक स्टेडियममध्ये आपत्कालीन वैद्यकीय सुविधा (Emergency Medical Support) ठेवणे बंधनकारक करण्यात आले.

येथे प्रकाशित : 09 नोव्हेंबर 2025 02:01 PM (IST)

क्रिकेट फोटो गॅलरी

आणखी पाहा

Comments are closed.