बुमराहपेक्षाही घातक गोलंदाज हा खेळाडू! दिग्गजाच्या वक्तव्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण!
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथ (Subramnyam Badrinath on Varun chakrawarthy) यांनी केलेल्या एका वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी20 मालिकेनंतर बद्रीनाथ यांनी सांगितले की, स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (Varun chakrawarthy) हा टी20 फॉरमॅटमध्ये जसप्रीत बुमराहपेक्षाही (Jasprit Bumrah) अधिक उपयोगी गोलंदाज आहे.
या मालिकेत वरुणने वेगवान खेळपट्टीवर सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी केली. 5 सामन्यांच्या मालिकेत त्याने भारतासाठी 3 डावांत एकूण 5 विकेट्स घेतल्या, त्याची सरासरी होती 16.40, तर इकॉनॉमी रेट फक्त 6.83 होता. त्याच्या या अचूक आणि प्रभावी गोलंदाजीमुळेच भारताने मालिका 2-1 ने जिंकली.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना बद्रीनाथ म्हणाले,आकडेवारी सांगते की वरुण चक्रवर्ती हा सध्या जगातील नंबर 1 टी20 गोलंदाज आहे. तो टीमसाठी बुमराहपेक्षाही अधिक मूल्यवान आहे. पावरप्ले असो किंवा 18वं षटक, जेव्हा धावा होत असतात, तेव्हा वरुण टीमसाठी सर्वात विश्वासार्ह गोलंदाज ठरतो. त्याच्या खेळातली सातत्यता आणि नियंत्रण पाहता तो आता एका वेगळ्याच दर्जावर पोहोचला आहे.
बद्रीनाथ यांनी पुढे सांगितले की,करिअरच्या सुरुवातीला फिटनेस समस्यांमुळे तो संघाबाहेर गेला होता, पण दुसऱ्यांदा परत आल्यानंतर त्याने अप्रतिम पुनरागमन केलं आहे. सध्या तो खेळाच्या एका नव्या पातळीवर पोहोचला आहे.
आजपर्यंत वरुणने भारतासाठी 29 टी20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 27 डावांत 45 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी 15.68 आहे. टी20 मध्ये त्याने दोन वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत, आणि एका सामन्यात फक्त 17 धावा देत घेतलेली 5 विकेट्स ही त्याची आंतरराष्ट्रीय टी20 मधली सर्वोत्तम कामगिरी आहे.
Comments are closed.