एक दोन नव्हे सलग आठ षटकार ठोकले, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक,आकाश चौधरीचं वादळ


सुरत: देशात सध्या बीसीसीआयच्या रणजी स्पर्धा सुरु आहेत. रणजी स्पर्धेत देशातील विविध राज्यातील क्रिकेट बोर्डांचे संघ सहभागी होतात. मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात रणजी मॅच सुरु आहे. रणजी ट्रॉफी प्लेट ग्रुप मॅच दरम्यान मेघालयच्या आकाश कुमार चौधरी यानं विक्रमी कामगिरी केली आहे. आकाश कुमार चौधरीनं  प्रथम श्रेणी क्रिकेट आणि रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक झळकावलं आहे. आकाश चौधरीनं या खेळीदरम्यान सलग 8 षटकार मारले. त्यानं केवळ 11 बॉलमध्ये अर्धशतक केलं.

अक्कास करारा करारा पार्डी : आकाश कुमार चौधरी हाफ

मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील मॅच सूरतच्या पिठवाला स्टेडियमवर सुरु आहे. आकाश कुमार चौधरीनं 11 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. आकाशच्या आक्रमक फलंदाजीनंतर मेघालयनं त्यांचा पहिला डाव 6 बाद 628 वर घोषित केला.

आकाश कुमार चौधरीनं वेन व्हाइट याचा विक्रम मोडला. व्हाइटनं यापूर्वी 2012 मध्ये एसेक्स विरुद्ध लीस्टरेशायरकडून खेळताना 12 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या होत्या. मेघालयनं संघ जाहीर केला तेव्हा आकाश कुमार चौधरीच्या धावा 14 बॉल 50 इतक्या होत्या.  आकाश कुमार चौधरीनं सलग 8 षटकार मारले.  आकाश कुमार चौधरीनं 126 व्या ओव्हरमध्ये  6 बॉलवर 6 सिक्स मारले. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये सलग दोन बॉलवर षटकार मारले.

रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारण्याची ही दुसरी वेळ आहे. रवी शास्त्री यांनी 1984-98 मध्ये तिलक राज विरुद्ध सहा षटकार मारले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही तिसरी वेळ आहे, ज्यामध्ये एखाद्या खेळाडूनं सलग 6 षटकार मारलेत.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक

आकाश कुमार चौधरीनं 11 बॉलमध्ये 50 धावा केल्या आहेत. त्यापूर्वी वेन व्हाइट यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 12 बॉलमध्ये लीसेस्टरशायर विरुद्ध 2012 मध्ये अर्धशतक केलं होतं.  वॅन वुरेन यानं 13 बॉलमध्ये, नेड एकर्सली यानं 14 बॉलमध्ये, खालिद महमूद यानं 15 बॉलमध्ये तर बनदिप सिंग यानं 15 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 बॉलमध्ये अर्धशतक केलं आहे.

प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक

11 चेंडू – आकाश कुमार चौधरी – भारत

12 बॉल – वेन व्हाइट – इंग्लंड

13 बॉल – माइकल वॅन वुरेन – दक्षिण अफ्रीका

14 बॉल – नेड एकरस्ली – इंग्लंड

15 चेंडू – खालिद महमूद – पाकिस्तान

15 बॉल – बनदीप सिंग – भारत

दरम्यान,मेघालयनं पहिल्या डावात अर्पित भटेवार यांच्या 207 धावांच्या जोरावर अरुणाचल प्रदेश समोर धावांचा डोंगर उभा केला आहे. अर्पित भटेवरानं 23 चौकार आणि 4 षटकार मारले. राहुल दलाल आणि कॅप्टन किशन लिंगदोह यांनी देखील शतकी खेळी केली. मेघालयनं 6 बाद 628 धावांवर डाव घोषित केला. अरुणाचल प्रदेश या मॅचमध्ये पराभवाच्या छायेत आहे. त्यांचा पहिला डाव 73 धावांवर आटोपला. फॉलोऑन नंतर दुसऱ्या डावात अरुणाचल प्रदेशनं 3 बाद 29 धावा केल्या.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.