रिषभ पंतची एक चूक, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा विजय


बंगळुरु : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका सुरु होणार आहेत. त्यापूर्वी भारत अ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन अनौपचारिक कसोटी सामने खेळवण्यात आले. दुसऱ्या अनौपचारिक कसोटीत दक्षिण आफ्रिका अ संघानं भारताच्या अ संघाचा पराभव केला. बंगळुरुत झालेल्या अनौपचारिक कसोटीत भारत अ संघानं दक्षिण आफ्रिका अ संघासोर विजयासाठी 417 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, आफ्रिकेनं 5 विकेट राखून हा विजय मिळवला.जॉर्डन हरमन यानं 91 धावांची खेळी केली.

भारत अ संघानं पहिल्या डावात 34 धावांची आघाडी मिळवली होती. दुसऱ्या डावात ध्रुव जुरेल 127 धावा, रिषभ पंत आणि हर्ष दुबेच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं 382 धावांवर डाव घोषित केला. रिषभ पंतनं 65 धावा तर हर्ष दुबेनं 84 धावा केल्या होत्या. मात्र, डाव घोषित करण्याचा निर्णय भारत अ संघाला महागात पडले आहेत.

रिषभ पंतचा एक निर्णय महागात

रिषभ पंत आणि संघ व्यवस्थापनानं डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. जो भारत अ संघाला महागात पडला. भारत अ संघानं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी 382 धावांवर डाव घोषित करावा. ध्रुव जुरेल चांगल्या लयीत होता आणि 127 धावांवर फलंदाजी करत होता. त्याच्या जीवावर भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर आणखी मोठं आव्हान ठेवता आलं असतं. मात्र, अतिआत्मविश्वास भारतीय संघाला महागात पडला.

ध्रुव जुरेलनं दोन्ही डावात शतकी खेळी केली. पहिल्या डावात ध्रुव जुरेलनं नाबाद 132 धावा केल्या. दुसऱ्या डावात देखील जुरेलनं  नाबाद 127 धावा केल्या. जुरेलनं या मालिकेतील पहिला सामना खेळला नव्हता. मात्र, दुसऱ्या कसोटीत त्यानं 259 धावा केल्या. त्यामुळं त्याला प्लेअर ऑफ द सीरीज पुरस्कार दिला. पहिली अनौपचारिक कसोटी भारत अ संघानं 3 विकेटनं जिंकली होती. दक्षिण आफ्रिकेनं दुसरी कसोटी जिंकल्यानं मालिका बरोबरीत सुटली आहे.

सिराज, कृष्णा, कुलदीप यादव अपयशी

दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या गोलंदाजांना संधी देण्यात आली होती. मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव हे या सामन्यात खेळत होते. मात्र, दुसऱ्या डावात हे दिग्गज गोलंदाज अपयशी ठरले. सिराजला 1 , आकाश दीपला 1 , प्रसिद्ध कृष्णाला 2 आणि हर्ष दुबेला  1 विकेट मिळाली. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.  भारताच्या या मालिकेतील कामगिरीकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.