घरेलू मैदानावर टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! सिराज-कुलदीपच्या उपस्थितीत भारतीय संघाचा दारुण पराभव

बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ (India A vs South Africa A) यांच्यात दुसरा 4 दिवसांचा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू भारत अ कडून खेळत होते. गोलंदाजीत मोहम्मद सिराज, आकाश दीप, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांची उपस्थिती होती. तरीदेखील, युवा खेळाडू असलेल्या दक्षिण आफ्रिका अ संघाने चौथ्या डावात तब्बल 417 धावा चेस करत भारतीय संघाला पराभवाचा सामना करायला लावला.

भारतीय मैदानावर इतका मोठं लक्ष्य गाठून आफ्रिकन संघाने सर्वांनाच थक्क केलं आहे. भारतीय गोलंदाजांच्या अनुभवासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अप्रतिम संयम आणि आत्मविश्वास दाखवला. या पराभवानंतर भारत अ च्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या नेतृत्वाखाली आता संघाच्या रणनीतीत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हा निकाल पाहता भारतीय संघ व्यवस्थापनाला पुढील मालिकांसाठी तरुण खेळाडूंसोबतच अनुभवी खेळाडूंच्या संतुलनाचा पुनर्विचार करावा लागणार आहे.

Comments are closed.