अहमदाबादमध्ये होणार टी20 विश्वचषकाचा पहिला सामना, फायनलचं ठिकाणही जाहीर! जाणून घ्या सविस्तर
2026 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे करणार आहेत. या विश्वचषकातील सेमीफायनल, फायनल आणि पहिल्या सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, विश्वचषकाचा पहिला सामना आणि अंतिम सामना दोन्ही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. तर, एक सेमीफायनल सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होईल. विश्वचषक 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 या कालावधीत पार पडण्याची शक्यता आहे.
याआधी 2023 च्या वनडे विश्वचषकातील उद्घाटन आणि अंतिम सामनाही अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम होस्ट करण्यात आला होता . रिपोर्टनुसार, जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनल सामना झाला, तर तो कोलंबो (श्रीलंका) येथे खेळवला जाईल, तर दुसरा सेमीफायनल मुंबईत होईल.
श्रीलंका हा या विश्वचषकाचा सह-मेजबान देश असल्याने, दोन्ही देशांतील एकूण 7 मैदानांवर सामने होतील. भारतातील सामने चेन्नई, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि कोलकाता या शहरांमध्ये होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेत प्रेमदासा स्टेडियम, पल्लेकेले, आणि डंबुला किंवा हम्बनटोटा यापैकी एखाद्या मैदानाची निवड केली जाऊ शकते.
वॉर्म-अप सामन्यांच्या ठिकाणांबाबत अजून अधिकृत माहिती आलेली नाही, मात्र बंगळुरूला काही वॉर्म-अप सामने देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय संघाचे सामने दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई अशा मोठ्या शहरांमध्ये आयोजित केले जाऊ शकतात.
BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक झाली होती, ज्यात निर्णय घेण्यात आला की 2023 च्या वनडे विश्वचषकाच्या तुलनेत या वेळी कमी शहरांमध्ये सामने घेतले जातील. या टी20 विश्वचषकात प्रत्येक मैदानावर सुमारे 6 सामने खेळले जाण्याची शक्यता आहे.
Comments are closed.