राजस्थान रॉयल्समध्ये ट्रेडच्या चर्चांदरम्यान रवींद्र जडेजाने घेतला मोठा निर्णय, क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण!
आयपीएल 2026 (IPL 2026) मधील संभाव्य ट्रेडिंग विंडोवर मोठी चर्चा सुरू असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्सचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) अचानक आपले इंस्टाग्राम अकाउंट निष्क्रिय (Deactivate) केले आहे.
जडेजाच्या या पावलामुळे चाहते आणि क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या जडेजाचं अकाउंट इंस्टाग्रामवर दिसत नाही, त्यामुळे लोकांमध्ये अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. मात्र, त्याने स्वतः अकाउंट बंद केलं की तांत्रिक अडचणींमुळे ते झालं, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
अलीकडेच अशी चर्चा सुरू झाली होती की, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात संजू सॅमसन (Sanju Samson) आणि रवींद्र जडेजा यांच्या संभाव्य ट्रेडबाबत चर्चा सुरू आहे. दोन्ही संघांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी जडेजाच्या सोशल मीडियावरून गायब होण्यामुळे अफवांना अधिक जोर आला आहे.
Comments are closed.