रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला


नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्याकडून टी 20 वर्ल्ड कप 2026 चं आयोजन करण्यात येणार आहे. गतविजेत्या भारतीयसंघासमोर आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद कायम ठेवण्याचं आव्हान आहे. भारताच्या टी 20 संघात कोणाचा समावेश असेल याबाबत चर्चा सुरु आहेत. ऑस्ट्रेलियात  नुकत्याच झालेल्या टी 20 मालिकेत संघात खूप बदल पाहायला मिळाले होते. हर्षा भोगले यानं भारताचा संभाव्य संघ निवडला आहे. त्यांनी संघात यशस्वी जयस्वाल, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा आणि रिषभ पंतला स्थन दिलेलं नाही.

टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान होणार आहे, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. मात्र , आयसीसीकडून अधिकृत वेळापत्रक जारी करण्यात आलेलं नाही. वर्ल्ड कप दोन तीन महिन्यांवर आल्यानं टी 20 वर्ल्ड कपच्या टीमच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

हर्षा भोगले यांनी कुणाला संधी दिली?

हर्षा भोगले यांनी टी 20 वर्ल्ड कपच्या संघाबाबत चर्चा करताना भारतीय संघात कोण असेल याबाबत मत मांडलं. त्यांनी यशस्वी जयस्वास नितीश कुमार रेड्डी आणि गतविजेत्या संघाचा विकेटकीपर रिषभ पंतला बाहेर ठेवलं. सलामीवीर म्हणून अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलला त्यांनी निवडलं. विकेट कीपर म्हणून संजू सॅमसन आणि जितेश शर्माला स्थान दिलं. रिषभ पंतला हर्षा भोगलेंनी बाहेर ठेवलं.

हार्दिक पांड्याचं कमबॅक होत असल्यानं नितीश कुमार रेड्डीला त्यांनी बाहेर ठेवलं. हर्षित राणाला देखील हर्षा भोगलेंनी 15 जणांच्या संघात स्थान दिलं नाही. आशिया कप, ऑस्ट्रेलियातील वनडे मालिका आणि टी 20 मालिकेत हर्षित राणा संघात असला तरी भारतीय खेळपट्ट्यांवर तिसऱ्या वेगवान गोलंदाजांची गरज नाही असं त्यांचं मत आहे. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग सोबत हार्दिक पांड्याची गोलंदाजी पुरेशी असल्याचं त्यांनी म्हटलं.

हर्षा भोगलेंनी त्यांच्या संघात चार ऑलराऊंडर खेळाडूंना संधी दिली आहे. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना संधी दिलीय. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर फिरकी गोलंदाजी करतात. त्याशिवाय कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती फिरकीपटू  म्हणून त्यांनी संधी दिली आहे. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांना हर्षा भोगलेंनी स्थान दिलंय.

संघ निवडून आल्याने हर्षाने त्रस्त केले

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेट कीपर), जितेश शर्मा (विकेट कीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रबराह, वरुण चक्रबराह, ज.

आणखी वाचा

Comments are closed.