गाडीत गर्लफ्रेंडला किस करणं गुन्हा आहे का? जाणून घ्या काय सांगतो कायदा
आजच्या आधुनिक काळात रिलेशनशिप, डेटिंग आणि एकत्र वेळ घालवणं हे अनेक तरुण-तरुणींच्या आयुष्याचा नैसर्गिक भाग झालं आहे. मात्र, या जवळिकीच्या क्षणांमध्ये कायद्याच्या मर्यादा कुठे ओलांडल्या जातात, याचं भान ठेवणं गरजेचं आहे. विशेषत: “गाडीत बसून किस करणं” किंवा “अत्यंत जवळ येणं” या कृती कायदेशीर दृष्ट्या चुकीच्या ठरू शकतात का, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. चला तर जाणून घेऊ या या संदर्भात काय सांगतो भारतीय कायदा. (Kissing girlfriend in car legal or illegal laws in india)
कायद्याच्या दृष्टीने कारमध्ये किस करणं चुकीचं आहे का?
भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 294 नुसार, सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणं हा गुन्हा मानला जातो. जर तुमची कार सार्वजनिक ठिकाणी जसं की पार्किंग लॉट, बाग, समुद्रकिनारा, मॉलच्या बाहेर किंवा रस्त्यावर उभी असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही “अश्लील” समजल्या जाणाऱ्या कृती करत असाल, तर पोलीस कारवाई करू शकतात. या प्रकरणात तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड, अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
मात्र, “अश्लील कृती” म्हणजे नक्की काय, हे प्रत्येक परिस्थितीनुसार बदलू शकतं. फक्त बोलणं, हसणं किंवा एकमेकांच्या जवळ बसणं हे गुन्हा मानलं जात नाही, पण जर कृती समाजाला अस्वस्थ करणारी किंवा सार्वजनिक शिस्त भंग करणारी वाटली, तर ती कायद्याच्या चौकटीत येऊ शकते.
सार्वजनिक ठिकाणी कपल्सना कोणते हक्क आहेत?
कपल्सना एकत्र फिरणं, हात धरून चालणं, गप्पा मारणं, मिठी मारणं या गोष्टींवर कुठलीही कायदेशीर मर्यादा नाही. परंतु, जर कोणत्याही कृतीमुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वस्थता निर्माण झाली किंवा एखाद्याने तक्रार केली, तर पोलिस तपासासाठी हस्तक्षेप करू शकतात. कार हे पूर्णपणे “खाजगी स्थान” (Private Space) नसतं, विशेषतः जेव्हा ती सार्वजनिक ठिकाणी उभी असते. त्यामुळे गाडीत काहीही घडल्यास ते Public Act म्हणून गणलं जाऊ शकतं.
पोलिस कारवाई कधी करू शकतात?
1) जर तुमचं वर्तन Public Nuisance, म्हणजेच सार्वजनिक त्रास किंवा अस्वस्थता निर्माण करत असेल.
2) जर कोणीतरी त्या घटनेची औपचारिक तक्रार केली असेल.
3) जर पोलिसांनी थांबण्यास सांगितलं आणि तुम्ही विरोध किंवा वाद घातला, तर त्यावरही कारवाई होऊ शकते.
प्रेम व्यक्त करणं गुन्हा नाही, पण ते कुठे आणि कसं व्यक्त करायचं, याचं भान ठेवणं आवश्यक आहे. कारमध्ये बसून किस करणं किंवा रोमँटिक क्षण घालवणं कायद्याने निषिद्ध नाही, जोपर्यंत ते सार्वजनिक शिस्त बिघडवत नाही.
थोडक्यात सांगायचं तर प्रेमात शहाणपण हवं आणि कायद्याचा आदर हवाच.
Comments are closed.