संगणकशास्त्राच्या शिक्षणाचे 'दादा'
प्राध्यापक राजारमन कालवश : विद्यार्थ्यांच्या यादीत नारायण मूर्तीसारखी व्यक्तिमत्त्वं सामील
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतात संगणकशास्त्र (कॉम्प्युटर सायन्स) शिक्षणाचे ‘पितामह’ प्राध्यापक वैद्येश्वरन राजारमन यांचे निधन झाले आहे. देशात तंत्रज्ञान क्रांतीचा पाया रचलेले व्यक्तिमत्त्व म्हणून प्राध्यापक राजारमन यांना ओळखले जाते. 1933 साली जन्मलेले राजारमन यांच्या आयुष्यातील 6 दशके कॉम्प्युटर सायन्स शिक्षणाला समर्पित राहिली. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
राजारमन यांच्या विद्यार्थ्यांच्या यादीत इन्फोसिस संस्थापक नारायण मूर्ती यासारख्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. 6 दशकांच्या कारकीर्दीत राजारमन यांच्या नावावर अनेक मोठ्या कामगिरीची नोंद झाली. 1965 मध्ये आयआयटी कानपूर कॉम्प्युटर सायन्समध्ये भारताचा पहिला फॉर्मल अकॅडेमिक प्रोग्राम सुरू करण्याचे श्रेय त्यांनाच जाते.
वैद्येश्वरन राजारमना यांच्या विद्यार्थ्यांमध्ये नारायण मूर्ती आणि टीसीएसचे पहिले सीईओ फकीर चंद कोहली यांचे नाव सामील आहे. नारायण मूर्ती त्यांना प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पालक म्हणून मानायचे. प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य मार्ग दाखवून त्याला राजारमन हे मार्गदर्शन करायचे असे मूर्ती यांनी सांगितले आहे.
नेहमीच राहणार आठवणीत
1982-94 पर्यंत आयआयएससीमध्ये सुपरकॉम्प्युटर शिक्षण आणि संशोधन केंद्राचे (एसईआरसी) अध्यक्ष म्हणून प्राध्यापक राजारमन यांनी भारताच्या सुपरकॉम्प्युटिंग आणि समांतर कॉम्प्युटिंग क्षमतांची निर्मिती केली आणि संशोधन संस्थांना अत्याधुनिक कॉम्प्युटेशलन साधनसामग्रीद्वारे सशक्त केले होते. त्यांच्या व्हिजनमुळेच विज्ञान आणि वाणिज्य पदवीधरांसाठी मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) कार्यक्रम आखण्यात आल्या, ज्यामुळे उदयोन्मुख आयटी उद्योगात महत्त्वपूर्ण मानवसंपदा आवश्यकता पूर्ण करणे शक्य झाले. 1987 मध्ये पंतप्रधानांच्या विज्ञान सल्लागार परिषदेकडून स्थापन एका समितीचे अध्यक्षत्व करत राजारमन यांनी स्वदेशी सुपरकॉम्प्युटर विकसित करण्यासाठी अत्याधुनिक कॉम्प्युटिंग विकास केंद्र स्थापन करण्याची शिफारस केली होती.
Comments are closed.