टॅरिफला विरोध करणारे मूर्ख; डोनाल्ड ट्रम्प यांनी फटकारलं, प्रत्येक अमेरिकन नागरिकाला 2000 डॉलर देण्याची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर ‘अमेरिकन फर्स्ट’ धोरण राबवण्यास सुरुवात केली. त्यांनी एकामागोमाग एक निर्णयांचा धडाका लावला. मध्यंतरी त्यांनी जगभरातील देशांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली. याला उद्योजक एलन मस्क यांच्यासह अनेक अमेरिकन नेत्यांनी विरोध केला. यामुळे ट्रम्प आणि मस्कमध्ये वितुष्टही निर्माण झाले. मात्र टॅरिफमुळे अमेरिका अरबो रुपयांची कमाई करत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. टॅरिफला विरोध करणारे मूर्ख असल्याचे म्हणत ट्रम्प यांनी श्रीमंतांना सोडून प्रत्येक अमेरिकन नागरिकांना मालामाल करण्याची घोषणा केली.
“जे लोक टॅरिफच्या विरोधात आहेत ते मूर्ख आहेत”: ट्रम्प म्हणतात की अमेरिकन लोकांसाठी येणारा किमान $2,000 लाभांश
वाचा @ANI कथा | https://t.co/DfnZ4asqRG#USअध्यक्ष #ट्रम्प #दर pic.twitter.com/mPGqsnpzUu
— ANI डिजिटल (@ani_digital) 9 नोव्हेंबर 2025

Comments are closed.