एलआयसी चषकावर दिल्लीचे वर्चस्व

लोकेश रावतच्या दणकेबाज नाबाद 97 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने दिव्यांग क्रिकेट चषक स्पर्धेत हरयाणाचा 9 विकेट राखून पराभव करीत दणक्यात एलआयसी चषक जिंकला. देशातील 16 आघाडीचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
मुंबईतील पी.जे.हिंदू जिमखान्यावर झालेल्या फायनलमध्ये हरयाणाने देवदत्तच्या नाबाद 67 जोरावर 15 षटकांत 155 धावा केल्या. त्याला स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱया गुलमदिनने (44) चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल सलामीवीर लोकेश कवटने 38 चेंडूंत नाबाद 97 धावांची खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्यात 10 सिक्स आणि 5 चौकारांचा समावेश होता. दिल्लीने 11 षटकांमध्ये 1 विकेटच्या मोबदल्यात 156 धावा करीत दिल्लीला विजेतेपद मिळवून दिले. रावतला ‘मॅन ऑफ द मॅच’च्या किताबाने गौरविण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर द फिजिकली चॅलेंज संघटनेचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे, अनिल जोगळेकर, खजिनदार राजेश पाटील, सचिव विनायक धोत्रे, वरिष्ठ सदस्य मीनल पोतनीस उपस्थित होते.
संक्षिप्त अर्क: हरयाणा 15 षटकांत 4 बाद 155 (देवदत्त नाबाद 67, गुलबदिन 44, अजय यादव 20/1, अजय भाटिया 29/1) पराभूत विरुद्ध दिल्ली 11 षटकांत सर्वबाद 156 (रावत कवट नाबाद 97, अभिषेक भाटिया 27, अमकचंद 23/0).

Comments are closed.