लेकी-सुनांवरची वैयक्तिक टीका टाळा, अन्यथा मी…; मंत्री उदय सामंतांचा पदाधिकाऱ्यांना इशारा


रत्नागिरी बातम्या : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र अनेक भागात महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवण्याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. तर दुसरीकडे रत्नागिरी (Ratnagiri News) जिल्ह्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये (BJP vs Shivsena) सुरू असलेला वाद काही थांबण्याची चिन्हं दिसत नाहीये. अशातच आता रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रचारात्यामुळे बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी आपल्या संभाव्य उमेदवार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

Uday Samant : ….तर त्याचा मी प्रचार थांबवेन, पालकमंत्री म्हणून माझे हे निर्देश

रत्नागिरी येथे प्रचाराच्या सभेदरम्यान बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत (Uday samant) म्हणाले तेलेकी-सुनांवरचे वैयक्तिक टीका टाळा. इतकच नाही तरजर कोणत्याही उमेदवाराने वैयक्तिक टीका केली तर त्याचा मी प्रचार थांबवेन, असा इशारा देखील उदय सामंत यांनी दिलाय. पालकमंत्री म्हणून माझे हे निर्देश आहेत, असं देखील सामंत यावेळी म्हणाले. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिवानी माने या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असू शकतात. शिवानी माने या भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या कन्या आहेत. आपली मुलगी विरोधी पक्षाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारत सावंत यांनी काहीच दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दरम्यान या संपूर्ण घटनेचा उल्लेख देखील सामंत यांनी आपल्या सभेत केला.

Uday Samant : आपली गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं नाही

वैयक्तिक टीका टिपणी करून काहीही साध्य होणार नाही. ती होता कामा नये. समोरच्याने आपली गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं नाही. त्यामुळे वैयक्तिक टीका टाळा, असा आदेश सामंत यांनी दिला. राजेश सावंत यांच्या घरातील मुलगी ही आपल्या घरातील मुलगी आहे, असं देखील सामंत म्हणाले. शिवाय राजेश सावंत यांनी आपण एकत्र कॉलेजमध्ये होतो. अशी आठवण देखील सामंत यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांना करून दिली. आपण विकास कामे केलेली आहेत. त्याचा प्रचारमध्ये वापर करा. आपल्या वरती विश्वास आहे म्हणून आपल्या सभांना गर्दी होत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक टीका होता कामा नये, असा आदेश आणि इशारा सामंत यांनी आपल्या उमेदवारांना आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना दिलाय.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.