…म्हणून शीतल तेजवानीच्या अटकेसाठी टाळाटाळ? बावधन पोलीस पुन्हा संशयाच्या भवऱ्यात


पार्थ पवार पुणे जमीन घोटाळा : पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात (Parth Pawar Pune Land Scam)  बावधन पोलिसांशी भूमिका संशयास्पद आहे. जमीन विक्रेती शीतल तेजवानीला (Sheetal Tejwani) अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून पोलिसांकडून तिच्या अटकेसाठी दिरंगाई केली जातीये, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण याचं बावधन पोलिसांकडे वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाचा तपास आहे. त्यावेळी ही अजित पवारांचे पदाधिकारी आणि वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणेसह दिर सुशील हगवणेला अटकेसाठी टाळाटाळ केली. त्यावेळी पोलिसांवर जसा राजकीय दबाव होता, तसाचं आत्ताही दबाव असणार हे साहजिक आहे. त्यामुळंच शीतल तेजवानीला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अटकेची दिरंगाई केली जातीये, हा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Vijay Kumbhar : CBI किंवा न्याय यंत्रणांनी चौकशी करावी; RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी

दुसरीकडे याच संगीत स्केलची पाचवी नोंदप्रश्नांवर बोट ठेवत पवार जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती पुण्यातील RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिलीय. 2021 चा शासन GR आहे त्यात कनिष्ठ वतनाच्या जमिनी हस्तांतरित करत असतील तर शासनाची परवानगी हवी, जो नजराणा आहे तो शासन निश्चित करणार. शीतल तेजवणी यांनी त्याचं सर्व्हे नंबर 88 च्या संदर्भातील पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे 11 हजार भरले आहेत, ते कुठल्या हेतूसाठी भरले आहेत, त्या पत्रात उल्लेख नाही. त्यामुळे हे सगळं प्रकरणात प्रशासन पातळीवर सगळ्यांना माहिती होतीत्यामुळे ह्यांची सर्वांची चौकशी करावी. चौकशी हि CBI किंवा न्याय यंत्रणांनी करावी अशी मागणी RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलीय.

एकनाथ खडसे :………..,इंच हेमंत गावंडेंनी भोसरी प्रकरणात आपल्या विरोधात तक्रार दाखल केली

पुण्यातील बोपोडी येथील सरकारी जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्याच्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे, तहसीलदार सूर्यकांत येवले आणि इतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ‘हा सराईत गुन्हेगार असून, आपण त्याला विरोध केला म्हणूनच हेमंत गावंडे यांनी भोसरी प्रकरणात आपल्या विरोधात तक्रार दाखल केली होती,’ असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, याच हेमंत गावंडे यांनी पूर्वी एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन प्रकरणात व्हिसलब्लोअरची भूमिका बजावली होती, ज्यामुळे खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता स्वतः हेमंत गावंडे जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात आरोपी झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचाही उल्लेख आल्याने याला राजकीय वळण लागले आहे.

आणखी वाचा

Parth Pawar Land Scam Pune Sheetal Tejawani: 300 कोटी घेऊन शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात पळून गेली? पुणे पोलिसांकडून शोधाशोध सुरु

आणखी वाचा

Comments are closed.