अलार्म वाजला, पण ती उठलीच नाही…आंध्र प्रदेशमधील 23 वर्षीय विद्यार्थिनीचा अमेरिकेत रहस्यमय मृत्यू

अमेरिकेतील टेक्सास येथे एका 23 वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा रहस्यमय मृत्यू झाला आहे. राजलक्ष्मी यार्लागड्डा असे मयत मुलीचे नाव असून ती मूळची आंध्र प्रदेशमधील रहिवासी होती. टेक्सास येथे ती ए अँड एम युनिव्हर्सिटी-कोर्पस क्रिस्टी येथून पदवीचे शिक्षण घेतले होते. सध्या ती नोकरीचा शोध घेत होती. मात्र 7 नोव्हेंबर 2025 रोजी ती अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली.
राजलक्ष्मी आंध्र प्रदेशमधील बापटला जिल्ह्यातील करमचेडू गावची रहिवासी होती. तिचे आई-वडील शेती करतात. चांगले शिकून मोठी नोकरी करण्याचे स्वप्न घेऊन राजलक्ष्मी अमेरिकेला गेली होती. मात्र आता तिचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.