IPL 2026: संजू सॅमसननंतर राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व कोण करणार? हे 3 खेळाडू दावेदारीसाठी आघाडीवर!

इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या (Indian premier league 2026) मिनी ऑक्शनपूर्वी भारतातील 2 खेळाडू सर्वाधिक चर्चेत आहेत. हे दोघे म्हणजे टीम इंडियाचे अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसन. अशी चर्चा आहे की राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात काही खेळाडूंची ट्रेड डील होऊ शकते.

रिपोर्टनुसार, राजस्थानने संजू सॅमसनच्या (Sanju Samson) बदल्यात चेन्नईकडून रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja & Sam karan) आणि सॅम करन यांची मागणी केली आहे. समोरची टीमही या डीलसाठी तयार असल्याचं समजतंय. मात्र, या ट्रेडची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही.

आता चाहत्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे, जर ही डील झाली, तर आगामी हंगामात राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व कोण करणार? कारण, गेल्या अनेक हंगामांपासून संजू सॅमसनच राजस्थानचा कर्णधार होता. टीममध्ये असे तीन खेळाडू आहेत जे संजूच्या गैरहजेरीत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळू शकतात.

यशस्वी जयस्वाल

यादीमधील पहिलं मोठं नाव आहे युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashavi jaiswal). तो राजस्थान फ्रँचायझीसोबत बराच काळ जोडलेला आहे आणि सध्या भारतीय कसोटी संघाचाही भाग आहे. गेल्या काही वर्षांत त्याचा खेळ अधिक परिपक्व झाला आहे. त्यामुळे पुढच्या हंगामात तो संघाचं नेतृत्व करताना दिसला, तरी आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

ध्रुव जुरेल

दुसरं नाव आहे ध्रुव जुरेलचं (Dhruv Jurel). विकेटच्या मागून तो खेळाचं उत्तम विश्लेषण करतो. टीमचे नवीन मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी यशस्वीसोबत त्यालाही कर्णधारपदासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे त्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

रियान पराग

राजस्थान रॉयल्सचा विश्वासू अष्टपैलू रियान परागने (Riyaan Parag) गेल्या हंगामात संजूच्या अनुपस्थितीत टीमचं नेतृत्व केलं होतं. याशिवाय, तो असमच्या रणजी संघाचंही नेतृत्व करतो. त्यामुळे IPL 2026 मध्ये पुन्हा एकदा तो राजस्थानचा कर्णधार म्हणून दिसू शकतो, अशी शक्यता आहे.

Comments are closed.