दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी, महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी कारमध्ये भीषण स्फोट झाला. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मुंबईतील संवेदनशील भागात गस्त आणि नाकाबंदी वाढवण्यात आली आहे. रेल्वे स्थानके, मॉल, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत.
दरम्यान, दिल्लीतील स्फोटानंतर उत्तर प्रदेशातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील प्रमुख ठिकाणे, धार्मिक स्थळे, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी कडक सुरक्षा ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियावरील अफवांवर देखील लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या सीमेवर नाकाबंदी लागू करण्यात येत आहे. नोएडा आणि गाझियाबादमधील पोलिसांना देखील सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

Comments are closed.