दक्षिण आफ्रिका विरुद्ध मालिकेपूर्वी जाणून घ्या WTC पॉईंट्स टेबलची परिस्थिती! भारत कितव्या स्थानावर?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 चक्रातील भारताची दुसरी घरेलु मालिका असेल. याआधी झालेल्या पहिल्या घरच्या मालिकेत टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 2-0 ने पराभव केला होता. आता जर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकली, तर त्याला WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा होऊ शकतो.
मालिका सुरू होण्याआधी पाहू या, सध्या WTC पॉइंट्स टेबलची स्थिती काय आहे?

सध्या WTC पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत तीनही सामने जिंकले असून, त्यांचा पॉइंट्स टक्केवारी 100% आहे. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंका आहे, ज्यांनी 2 सामन्यांपैकी एक सामना जिंकला आणि एक ड्रॉ केला. त्यांचा पॉइंट्स टक्केवारी 66.67% आहे.

भारताने आतापर्यंत 7 सामने खेळले, ज्यात 4 विजय, 2 पराभव आणि 1 सामना ड्रॉ झाला आहे. भारताचा पॉइंट्स टक्केवारी 61.90% आहे. तर गतविजेता दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावर असून त्यांचा पॉइंट्स टक्केवारी 50% आहे.

पहिला क्रमांक – ऑस्ट्रेलिया
दुसरा क्रमांक – श्रीलंका
तिसरा क्रमांक – भारत
चौथा क्रमांक – दक्षिण आफ्रिका
पाचवा क्रमांक – पाकिस्तान

भारतीय संघाने यापूर्वी 2021 आणि 2023 चे WTC फायनल खेळले आहेत. पण न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत पराभव आणि नंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावल्यामुळे भारताला 2025 च्या फायनलमध्ये स्थान मिळू शकले नाही.

या चक्रात भारताची ही तिसरी कसोटी मालिका असेल. पहिल्या मालिकेत भारताने इंग्लंडविरुद्ध 2-2 ने ड्रॉ केले. दुसऱ्या मालिकेत वेस्ट इंडिजचा 2-0 ने पराभव केला.
आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोट्या खेळल्या जाणार आहेत. त्यानंतर ऑगस्ट 2026 मध्ये श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटींची मालिका होईल. ऑक्टोबर 2026 मध्ये न्यूझीलंडचा दौरा, तिथे दोन कसोट्या होतील. या चक्रातील शेवटची मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोट्यांची असेल.

Comments are closed.