Ratnagiri Crime News – रत्नागिरी हादरली! मांडवीत भररस्त्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार

रत्नागिरी शहरात थरकाप उडवणारी एक गंभीर घटना सोमवारी (10 नोव्हेंबर 2025) सायंकाळी मांडवी येथील भुतेनाका परिसरात घडली आहे. भररस्त्यात दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणावर मद्यधुंद हल्लेखोराने कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
घडलेल्या घटनेनुसार, सायंकाळी भुतेनाका रस्त्यावर एक मद्यप्राशन केलेला तरुण हातात कोयता घेऊन फिरत होता आणि येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना धमकावत होता. याच वेळी बस स्थानकाकडून मांडवीच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाला त्याने लक्ष्य केले. या हल्लेखोराने कोणताही विचार न करता त्या तरुणावर कोयत्याने एकामागोमाग एक वार केले.

Comments are closed.