भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे टॉप-5 गोलंदाज, टीम इंडियाचा जंबो नंबर-1 वर
५.मॉर्न मॉर्केल: दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज आणि भारतीय संघाचा सध्याचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भारताविरुद्धच्या 17 कसोटी सामन्यांच्या 31 डावांत 58 बळी घेत त्याने ही कामगिरी केली आहे. त्याने आपल्या देशासाठी 86 कसोटीत 309 विकेट्स घेतल्या.
4. हरभजन सिंग: भारतीय संघातील दिग्गज फिरकी गोलंदाजांपैकी एक हरभजन सिंग भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा चौथा गोलंदाज आहे. त्याने 11 कसोटी सामन्यांच्या 19 डावात 60 बळी घेत या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्याने टीम इंडियासाठी 103 कसोटी सामन्यांच्या 190 डावात 417 विकेट घेतल्या.
Comments are closed.