धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, ईशा देओलने दिली मोठी अपडेट

धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा नुकतीच माध्यमात पसरल्यानंतर, अभिनेत्री ईशा देओल हिने एक पोस्ट केली आहे. या पोस्ट अंतर्गत माझे वडील धर्मेंद्र जिवंत आहेत त्यांचे निधन झाले नाही असे म्हटले आहे.
यावर अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. त्यांनी एक्सवर म्हटले की, “जे घडत आहे ते अक्षम्य आहे. उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि हळूहळू बरे होत असलेल्या व्यक्तीबद्दल जबाबदार चॅनेल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार वर्तन आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करा.”
जे होत आहे ते अक्षम्य आहे! जबाबदार चॅनेल उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरे होत असलेल्या व्यक्तीबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादर आणि बेजबाबदारपणाचे आहे. कृपया कुटुंबाला योग्य आदर द्या आणि त्याच्या गोपनीयतेची गरज आहे.
— हेमा मालिनी (@dreamgirlhema) 11 नोव्हेंबर 2025

Comments are closed.