लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा…; प्र


लाल किल्ला दिल्ली स्फोट: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने (Red Fort Delhi Blast Hindi) काल (सोमवारी, ता १०) संध्याकाळी दिल्लीसह देश हादरला. यात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. लोकांनी या हल्ल्याची (Red Fort Delhi Blast Hindi) भीषणता वर्णन केली आहे. मयंक अग्रवाल आणि गिरीराज सिंग यांना सोमवारची संध्याकाळ आठवते. ते १७ व्या शतकातील इतिहास असलेल्या श्री दिगंबर जैन लाल मंदिरात होते.(Red Fort Delhi Blast Hindi)

शहाजहानच्या कारकिर्दीत हे मंदिर पूजास्थळ म्हणून बांधले गेले असे मानले जाते. सोमवारी संध्याकाळी स्फोट झाला तेव्हा मंदिरात एक छोटासा विवाहसोहळा सुरू होता. “आम्हाला खूप मोठा आवाज ऐकू आला. सुरुवातीला आम्हाला वाटले की सिलिंडरचा स्फोट झाला आहे, कारण त्या परिसरात अनेक अन्न आणि पेय पदार्थांची दुकाने आहेत. जेव्हा आम्ही बाहेर पळत गेलो तेव्हा आम्हाला कारचे भाग इकडे तिकडे विखुरलेले दिसले आणि नंतर मानवी मांस आणि शरीराचे अवयव परिसरामध्ये विखुरलेले दिसून आले,” असे परिसरातील प्रत्यक्षदर्शीने मयंक अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.(Red Fort Delhi Blast Hindi)

Delhi Red Fort Blast: गाडीचे तुकडे आणि काचा पाहिल्या – गिरीराज सिंह

मंदिराचे एक पर्यवेक्षक गिरिराज सिंह हे देखील घटनेच्या वेळी मंदिरात उपस्थित होते. ते म्हणाले, “मी मंदिरात असताना मला खूप मोठा आवाज ऐकू आला. “मी आणि इतर काही कर्मचारी बाहेर पळत सुटलो. आम्हाला सर्वत्र मांसाचे तुकडे, कारचे तुकडे आणि वेगळे झालेले भाग आणि तुटलेल्या काचा दिसल्या. सर्वत्र धूर आणि ज्वाळा होत्या.” उत्तर दिल्लीतील कोतवाली पोलिस ठाण्यात UAPA आणि स्फोटक कायद्याच्या कलम १६, १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Delhi Red Fort Blast: लाल किल्ल्याजवळ संध्याकाळी झाला स्फोट

सोमवारी संध्याकाळी ६:३० वाजताच्या सुमारास, लाल किल्ल्याभोवतीचा परिसर आणि काही पावलांवर असलेल्या चांदणी चौक बाजारपेठेत गर्दी झाली होती. काही मिनिटांनंतर, एक पांढऱ्या रंगाची हुंडई आय२० कार आली. स्मारकाजवळील सिग्नलवरून चौकात जाताना स्फोट झाला. 12 पेक्षा अधिक वाहनांना आग लागली आणि त्यात बसलेले सर्वजण ठार झाले. काही क्षणातच, घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर मृतदेहांचे तुकडे विखुरलेले आढळले. विशेष कक्षाच्या अधिकाऱ्यांनी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी एफएसएल अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली.

Delhi Red Fort Blast:  टाइमलाइन समोर

– संध्याकाळी ६:५२ वाजता: दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ बाहेर हा स्फोट झाला. दिल्ली पोलिस आयुक्त सतीश  म्हणाले की, लाल किल्ला ट्रॅफिक सिग्नलजवळ एका संथ गतीने चालणाऱ्या वाहनात हा स्फोट झाला. “सोमवारी संध्याकाळी अंदाजे ६:५२ वाजता, प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका संथ गतीने जाणाऱ्या वाहनाचा सिग्नलजवळ स्फोट झाला. इतर वाहनांनाही याचा फटका बसला. सर्व एजन्सी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. काही लोकांचा मृत्यू झाला आहे आणि काही जण जखमी झाले आहेत,” असे ते म्हणाले.
– संध्याकाळी  ७ वाजता – लाल किल्ला परिसर सहसा संध्याकाळी खूप गजबजलेला असतो. सोमवारीही हा परिसर वाहनांनी आणि पादचाऱ्यांनी गजबजलेला होता. स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली.
– संध्याकाळी ७:२९ – अग्निशमन दलाच्या जवानांनी ३७ मिनिटांत आग आटोक्यात आणली. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. उपमुख्य अग्निशमन अधिकारी ए.के. मलिक म्हणाले, “आम्हाला एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली. आम्ही तात्काळ मदत केली आणि घटनास्थळी सात गाड्या पाठवल्या. संध्याकाळी ७:२९ वाजेपर्यंत आग आटोक्यात आली.”
– रात्री ९:२३ – लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, घटनेच्या प्रत्येक पैलूची चौकशी केली जात आहे. घटनेच्या १० मिनिटांतच विशेष कक्षाची टीम घटनास्थळी पोहोचली. एफएसएलसह एनएसजी आणि एनआयए टीमने तपास सुरू केला.
– रात्री ९:२८ – घटनेनंतर, भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ लोकनायक रुग्णालयात धाव घेतली आणि घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस केली.
– रात्री ९:४२ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
– रात्री १०:३५ – त्यानंतर गृहमंत्र्यांनी घटनास्थळी पोहोचून तपासात सहभागी असलेल्या दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

आणखी वाचा

Comments are closed.