Renuka Shahane: तुला महिन्याला स्टायपेंड देईन,पण माझ्यासोबत…; रेणुका शहाणेंने केली निर्मात्याची पोलखोल

90च्या दशकातला बॉलीवूडचा सर्वात गाजलेला ‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांना तितकात आवडतो. या चित्रपटातील पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या चित्रपटात सलमान खानच्या वहिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेणुका शहाणे सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकतेच एका मुलाखती दरम्यान त्यांना आलेला एक भयानक अनुभव त्यांनी शेअर केला. रेणुका यांनी एका विवाहित निर्मात्याची पोलखोल केली आहे. त्यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
मराठीसह हिंदी चित्रपट गाजवणाऱ्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला. एका चित्रपटाच्या संदर्भात बोलण्यासाठी एक चित्रपट निर्माता रेणुका यांच्या घरी आल्याचे त्या म्हणाल्या. माझ्या करिअरच्या सुरूवातीच्या काळात एक भयंकर किस्सा माझ्यासोबत घडला. एक निर्माता तेव्हा थेट माझ्या घरी आला आणि त्याने माझ्यासमोर घाणेरडा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी तो म्हणाला, मी विवाहीत आहे, पण तू माझ्यासोबत राहा. मी तुला एका साडीच्या ब्रँडची अॅम्बेसेडर बनवू इच्छितो. आणि यासाठी मी तुला पगारही देईन… हे त्याचे बोलणे एकून मी आणि माझी आई आम्ही दोघीही सुन्न झालो. मी त्याला तेव्हाच नकार दिला आणि घराबाहेर जाण्यास सांगितलं, असे रेणुका म्हणाल्या.
रेणुकांनी त्यावेळी ठामपणे नकार दिला. या क्षेत्रात असे प्रस्ताव अनेकांना मिळतात, चित्रपटसृष्टीत सगळ्यांसाठी हे सोपे नसते. अशा परिस्थितीत कलाकारांसमोर फक्त दोन पर्याय असतात.. एक तर शांत राहायचं किंवा मग काम सोडून द्यायचं. जर तुम्ही त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही आणि त्याला विरोध केला तर तुम्हा काम मिळण कठीण होतं. तुम्हाला प्रोजेक्टमधून बाहेर काढलं जातं. बऱ्याचदा पैसे दिले जात नाहीत. रेणुकांच्या बाबतीत असे घडले नाही, पण इंडस्ट्रित नव्या कलाकारांना याचा त्रास सहन करावा लागतो, असे त्या म्हणाल्या.

Comments are closed.