संजू सॅमसनच्या बदल्यात रविंद्र जडेजा अन् सॅम करन; राजस्थान अन् चेन्नईमध्ये मोठी डील, IPL मधील
संजू सॅमसन रवींद्र जडेजा आयपीएल ट्रेड विंडो: आयपीएल 2026 हंगामासाठीच्या (IPL 2026) रिटेन्शनची अंतिम मुदत जसजशी जवळ येत आहे, तसतसे चाहत्यांच्या हृदयाचे ठोकेही वाढत चालले आहेत. बीसीसीआयकडून अद्याप रिटेन्शनची अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली, तरी असा अंदाज व्यक्त केला जात आहे की नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीपर्यंत सर्व फ्रँचायझींनी आपल्या राखून ठेवलेल्या (रिटेन केलेल्या) खेळाडूंची यादी सादर करावी लागेल. यादरम्यान, राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यातील डीलची मोठी चर्चा रंगली आहे.
रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि सॅम करन (Sam Curran) हे संजू सॅमसनच्या (Sanju Samson) बदल्यात चेन्नई सुपर किंग्स सोडून राजस्थान रॉयल्समध्ये जाणार आहेत. क्रिकबझच्या मते, तिन्ही खेळाडूंनी या व्यवहाराला सहमती दर्शवली आहे आणि करारावर स्वाक्षरी केली आहे. तथापि, या व्यवहाराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे आगामी आयपीएलच्या हंगामात रविंद्र जडेजा आणि सॅम करन राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसेल. तर संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसेल.
🚨 RR आणि CSK ने त्यांच्या व्यापाराची पुष्टी केली. 🚨
– CSK मध्ये संजू सॅमसन.
– आरआरमध्ये रवींद्र जडेजा आणि कुरन.CSK आणि RR ने प्रक्रिया सुरू केली आहे ज्याला औपचारिक होण्यासाठी 48 तास लागतील. (क्रिकबझ). pic.twitter.com/tFAz98yhhI
— मुफद्दल वोहरा (@mufaddal_vohra) 10 नोव्हेंबर 2025
परदेशी खेळाडूंच्या करारासाठी एनओसी आवश्यक- (Sam Curran IPL 2025)
दरम्यान, आयपीएलच्या नियमांनुसार, कोणत्याही परदेशी खेळाडूंच्या करारासाठी एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) आवश्यक आहे. सॅम करन हा इंग्लंडचा खेळाडू असल्याने, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) त्याच्या व्यापार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकते. संजू सॅमसन आणि रविंद्र जडेजा दोघेही आपल्या-आपल्या संघांशी अनेक वर्षांपासून जोडलेले आहेत. सॅमसन राजस्थान रॉयल्ससाठी 11 वर्षे खेळला आहे, तर जडेजा गेली 12 हंगामे चेन्नई सुपर किंग्सचा अविभाज्य भाग राहिला आहे.
रविंद्र जडेजा चेन्नईसाठी ठरला हुकुमी एक्का- (Ravindra Jadeja IPL 2025)
रविंद्र जडेजानं आपल्या आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 254 सामने खेळले आहेत. सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये तो विराट कोहली, एम.एस. धोनी, रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्या पाठोपाठ आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी रविंद्र जडेजा 143 विकेट्स घेतल्या आहेत, जे संघातील सर्वाधिक आहेत. आयपीएल 2022 हंगामात रविंद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्स संघाचं नेतृत्वही देण्यात आलं होतं, पण संघाच्या निराशाजनक सुरुवातीमुळे त्यानं पुन्हा कर्णधारपद धोनीकडे परत सोपवलं होतं.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.