ओपनचे वॉर्ड ओबीसीत गेल्याने बड्या नगरसेवकांचा पत्ता कट, कोणाकोणाला वॉर्ड आरक्षणाचा फटका बसणार?


BMC निवडणूक प्रभाग आरक्षण: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात आरक्षण सोडतीचा हा कार्यक्रम जाहीर पडला. शाळेतील लहान मुलांकरवी चिठ्ठी काढून वॉर्डनिहाय आरक्षण (Mumbai Ward Reservation) जाहीर करण्यात आले. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election 2025) एकूण 227 प्रभागांपैकी 114 प्रभाग हे महिला उमेदवारांसाठी आरक्षित असतील. तर अनुसुचित जातींसाठी एकूण 15 वॉर्ड राखीव असतील यामध्ये अनुसुचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी 8 वॉर्ड आरक्षित असतील. तर अनुसुचित जमातीसाठी दोन वॉर्ड राखीव असतील त्यापैकी एका ठिकाणी महिला उमेदवारासाठी आरक्षण असेल. तर ओबीसींसाठी मुंबईतील 61 वॉर्ड राखीव असतील, यामध्ये 31 महिला ओबीसी उमेदवारांची समावेश असेल. तर सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 61 वॉर्ड राखीव असतील, यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या 31 महिला उमेदवारांचा समावेश असेल. (Mumbai News)

मात्र, या आरक्षण सोडतीमुळे अनेक माजी नगरसेवकांना फटका बसला आहे. गेल्यावेळी अनेक ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गाचे वॉर्ड असणाऱ्या भागात यंदा ओबीसी आरक्षण जाहीर झाले आहे. तर काही प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे गेल्या टर्ममध्ये निवडून आलेल्या काही नगरसेवकांना आता एकतर निवडणूक लढवता येणार नाही किंवा त्यांना स्वत:साठी दुसरा वॉर्ड पाहावा लागेल. अशा नगरसेवकांमध्ये तेजस्विनी घोसाळकर, मिलिंद वैद्य, कप्तान मलिक, रवी राजा यांच्यासारख्या बड्या नगरसेवकांचा समावेश आहे. विनोद घोसाळकरांची सून तेजस्विनी घोसाळकर यांचा मतदार संघ मागासवर्ग प्रवर्ग (OBC) म्हणून आरक्षित झाला आहे. मिलिंद वैद्य यांचा १८२ वॉर्ड देखील आता ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. याशिवाय, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 10, 11,12 आणि 13 हे सलग चार वॉर्ड ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी आरक्षित झाले आहेत. यापैकी 11,12 आणि 13 हे प्रभाग ओबीसी महिला उमेदवारासाठी आरक्षित असतील.

Mumbai Election News: यंदा वॉर्ड आरक्षित झाल्याने कोणाला फटका बसणार?

१३३ – महिला वॉर्ड  – माजी नगरसेवक परमेश्वर कदम शिंदे सेना
१८३ – महिला वॉर्ड  – माजी नगरसेवक गंगा माने
१४७ – महिला वॉर्ड  – माजी नगरसेवक अंजली नाईक (ओबीसी)
१८६ – महिला वॉर्ड  – माजी नगरसेवक वसंत नकाशे (ठाकरे गट) ओबीसी सिट
१५५ – महिला वॉर्ड  – माजी नगरसेवक श्रीकांत शेट्ये – ठाकरे गट आधी ही SC
११८ – महिला वॉर्ड  – माजी नगरसेवक उपेंद्र सावंत
१५१ – महिला वॉर्ड  माजी नगरसेवक राजेश फुलवारिया
१८९ – महिला वॉर्ड – माजी नगरसेवक हर्षदा मोरे
२०८ – ओबीसी – माजी नगरसेवक रमाकांत रहाटे
७२ – ओबीसी – माजी नगरसेवक पंकज यादव (२०१७ – ओबीसी)
216 – OBC-(2017-OBC)
१७० – ओबीसी – माजी नगरसेवक कप्तान मलिक ( एनसीपी- AP)
१७६ – ओबीसी – माजी विरोधी पक्ष नेता – रवी राजा
१९१ – ओबीसी माजी नगरसेवक विशाखा राऊत
१०८ – ओबीसी – माजी नगरसेवक नील सोमय्या
११७ – ओबीसी – माजी नगरसेवक सुवर्णा कारंजे
१७१ – ओबीसी – माजी नगरसेवक सानवी तांडेल
१- ओबीसी – माजी नगरसेवक तेजस्विनी घोसाळकर
२२६ – ओबीसी – माजी नगरसेवक हर्षदा नार्वेकर
१८२ – ओबीसी – माजी नगरसेवक मिलिंद वैद्य ठाकरे गट
२०८ – ओबीसी – माजी नगरसेवक रमाकांत रहाटे
८७ – ओबीसी – माजी नगरसेवक – विश्वनाथ महाडेश्वर
१५३ – ओबीसी – माजी नगरसेवक अनिल पठाणकर
१९३ – ओबीसी – माजी नगरसेवक हेमांगी वरळीकर
171- ठाकरे गटाचे सदानंद परब यांना फटका १७१ वॉर्ड महिला ओपन आरक्षित
किशोरी पेडणेकरांचा 199 वॉर्ड महिला ओपन, किशोरी पेडणेकरांचा मार्ग मोकळा

आणखी वाचा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महिलांसाठी 114 वॉर्ड राखीव; SC, ST साठी कोणते वॉर्ड आरक्षित?

आणखी वाचा

Comments are closed.