पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद स्फोटाने हादरली, हायकोर्टाबाहेर कारमधील स्फोटात 12 जणांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाच्यावेळी कोर्ट परिसराच्या पार्किंगमध्ये कार उभी होती.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्ट परिसरात गर्दी आणि वाहतूक कोंडी असताना हा स्फोट झाला. स्फोटात अनेक वकील आणि सामान्य नागरीक जखमी झाले. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आसपासचा परिसर बंद केला असून तपास सुरू आहे.
बदला ऑन द स्पॉट
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या जिल्हा न्यायालयात भीषण स्फोट.
अनेक वकिलांच्या चिंधड्या उडाल्या, अनेक गाड्या आगीत जळून खाक झाल्या…
आतापर्यंत 6 ठार, 12 जखमी… मृतांचा आकडा वाढू शकतो.
स्फोट पाहून वकिलांचे भान हरपले असून ते दुरून घटना पाहत आहेत. pic.twitter.com/XpBHP45V5O— रिनिती चॅटर्जी (@ChatterjAsking) 11 नोव्हेंबर 2025
प्राथमिक तपासात हा सिलिंडरचा स्फोट असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे. स्फोटाचे कारण आणि इतर घटकांचा तपास करण्यासाठी सुरक्षा दल आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. या घटनेनंतर कोर्ट आणि आजुबाजूच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्फोटाचे नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.

Comments are closed.