हे निर्लज्ज लोक फक्त तुमचा वापर करतील…, सुनील गावसकरांनी टीम इंडियांच्या रणरागिंणींना केलं सावध

टीम इंडियाच्या महिला क्रिकेट संघाच्या एकदिवसीय विश्वचषक विजयाने देशभरात आनंदाचे वातावरण आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर महिला संघाच्या वाढत्या लोकप्रियतेचे सगळीकडून कौतुक होत आहे. सरकारपासून ते अगदी मोठ मोठ्या ब्रँडपर्यंत सर्वांनी या रणरागिणींचे कौतुक केले आहे. दरम्यान, हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी हरमनप्रीत कौर आणि संपूर्ण टीमला सावधगिरीचा इशारा दिला आहे. जर काही रोख रक्कम, बक्षिसे किंवा कोणत्याही प्रकारचा करार त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही तर निराश होऊ नका, असे आवाहन केले आहे.

हिंदुस्थानी संघाने पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यापासून अभूतपूर्व बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे. हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 51कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे, त्याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कडून संघाला 40 कोटी रुपयांचे बक्षीस देखील देण्यात आले आहे. तसेच अनेक राज्य सरकारांनी रिचा घोष, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, हरलीन देओल इत्यादी खेळाडूंना रोख बक्षिसे देण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, टीम इंडियाला प्रत्येक क्षेत्रातून मिळाणाऱ्या या बक्षिसांबाबत गावसकर यांनी महिला टीमला इशारा दिला आहे. काही बक्षिसे कदाचित तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे नाराज होऊ नका, असे म्हणत त्यांनी 1983 मध्ये हिंदुस्थानच्या पुरुष संघाने विश्वचषक जिंकला तेव्हाचा त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला.

“सावधगिरीचा एक शब्द मुलींसाठी आहे. जर कोणी वचन दिलेले आणि काही बक्षिसे तुमच्यापर्यंत पोहोचली नाहीत तर कृपया निराश होऊ नका. हिंदुस्थानात, जाहिरातदार, ब्रँड आणि व्यक्ती विजेत्यांचा आधार घेऊन स्वतःची मोफत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. संघाचे अभिनंदन करणाऱ्या जाहिराती आणि होर्डिंग्जवर एक नजर टाका. तोपर्यंत ते संघ आणि वैयक्तिक खेळाडूंसाठी स्पॉन्सर करतील. कारण इतर लोक फक्त त्यांच्या ब्रँडचा किंवा स्वतःचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असे गावसकर यांनी सांगितले आहे.

पुढे गावसकर म्हणाले की, 1983 च्या पुरुष क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाला अशीच अनेक आश्वासने देण्यात आली होती. परंतु त्यापैकी काही कधीच प्रत्यक्षात पूर्ण करण्यात आली नाहीत. पुन्हा एकदा तुमचे हार्दिक अभिनंदन. देशाला तुमचा अभिमान आहे. जय हिंद, असे सुनील गावसकर म्हणाले.

Comments are closed.