ठाण्यात महापालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये 66 जागा महिलांसाठी राखीव; इच्छुकांची धाकधूक वाढली

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी राम गणेश गडकरी रंगायतन येथे महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 131 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी 66 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. तर उर्वरित 65 जागा या सर्वसाधारण गटासाठी असतील. या सोडतीमुळे अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

ठाणे महानगरपालिकेत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यातून एकूण 131 सदस्य निवडले जाणार आहे. यात अनुसूचित जातींसाठी 9 जागा, अनुसूचित जमातींसाठी 3 जागा, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 35 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 84 जागा आहेत. तर महिलांसाठी 66 जागा आरक्षित आहेत. यात 30 प्रवर्गासाठी मंगळवारी प्रत्यक्ष आरक्षण सोडत काढण्यात आली.ठाणे महानगरपालिकेत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यापैकी, 32 प्रभाग हे चार सदस्यीय असून 1 प्रभाग तीन सदस्यीय आहे. या 33 प्रभागातून एकूण 131 नगरसेवक निवडले जाणार आहेत.

ठाणे महानगरपालिकेतील एकूण सदस्यसंख्या – 132

जाहीर झालेली सोडत

सर्वसाधारण प्रवर्ग – 84

महिला राखीव- 41

सर्वसाधारण – 43

ओबीसी प्रवर्ग – 35

महिला – १८

सर्वसाधारण ओबीसी – 17

अनुसूचित जाती – ९

अनुसूचित जाती महिला – ५

अनुसूचित जाती सर्वसाधारण – 4

अनुसूचित जमाती – 3

अनुसूचित जमाती महिला – 2

अनुसूचित जमाती सर्वसाधारण – 1

Comments are closed.