चंद्रपूर महानगरपालिकेच्या 17 प्रभागांसाठी 66 सदस्य पदासाठी आरक्षण सोडत जाहीर; 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव

राज्यात आगामी काळात महानगरपालिका निवडणुकीचा बार उडणार आहे. त्याची रणधुमाळी सुरू झाली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या एकूण 17 प्रभागातून 66 सदस्य पदासाठी मंगळवारी शहरातील प्रियदर्शनी सभागृहात आरक्षण सोडत जाहीर झाली. 66 पैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत जिल्हाधिकारी कार्यालय ,महानगरपालिकेचे अधिकारी- कर्मचारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी ही सोडत जाहीर करण्यात आली.

अनुसूचित जातीच्या 13 जागांपैकी 7 जागा महिला राखीव आहेत

अनुसूचित जमातीच्या 5 जागांपैकी 3 महिला राखीव आहेत

नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 17 जागांपैकी 9 महिला राखीव आहेत

खुल्या प्रवर्गाच्या एकूण 31 जागांपैकी 14 जागा महिला राखीव असतील.

Comments are closed.