Winter Special- लहान बाळाला थंडी वाजतेय कसं ओळखाल?
नोव्हेंबर महिना सुरू झाला की थंडीची चाहूल लागते. त्याचबरोबर ज्यांच्या घरात एक वर्षाहून लहान बाळ आहेत अशा पालकांचीही चिंता वाढते. कारण थंडीमुळे मुलांना सर्धी खोकला होतो. म्हणून आपण त्यांना उबदार कपडे घालतो. पण ही लहान बाळ त्यांना थंडी वाजत आहे हे सांगू देखील शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे आई वडीलांना सतत लक्ष ठेवावे लागते. अशावेळी बाळाला थंडी वाजतेय का हे कसं ओळखायचं याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात ते बघूया.
तर बाळाला थंडी वाजतेय का हे बघण्यासाठी मोठ्यांनी हाताच्या तळव्यांनी नाही तर हाताच्या उलट्या बाजूने बाळाच्या पोटाला, हाताला ,पायांना स्पर्श करावा. जर बाळाचे पोट गरम असेल आणि हात,पायही गरम असतील तर याचा अर्थ बाळाला थंडी वाजत नाहीये. पण जर बाळाचे हात, पाय पोटापेक्षा थंड असतील तर याचा अर्थ बाळाला थंडी वाजत आहे.
अशावेळी काय करावे ?
सगळ्यात आधी बाळाचे हात, पाय उबदार ब्लँकेटने झाकावेत. किंवा हाता पायाना मोजे घालावेत.
बाळाला लोकरीची टोपी घालावी
जर घरातील वातावरणही थंड असेल तर रुम हीटर लावावा.
बाळाला आईचे दूध द्यावे. त्यामुळे बाळाच्या शरीरात उष्णता निर्माण होते.
मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांच्या शरीरावर बदलत्या वातावरणाचा लगेच परिणाम होतो. यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. जर बाळाचा चेहरा खूप थंड झाला असेल नीळा पडत असेल आणि थंडीने बाळाला हुडहुडी भरली असेल तर त्याला तात्काळ डॉक्टरांकडे न्यावे.
Comments are closed.