आयपीएलसाठी सीएसकेची नवीन टीम तयार! धोनीसोबत खेळणार संजू सॅमसन, हे खेळाडू जाणार संघाबाहेर?
आयपीएल 2026च्या ऑक्शनचा उत्साह हळूहळू वाढत चालला आहे. ऑक्शनपूर्वी कोणत्या संघाने कोणते खेळाडू रिटेन करायचे आणि कोणते खेळाडू रिलीज केले जाणार, यावर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या संघात मोठा बदल होऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, संजू सॅमसन सीएसकेच्या संघात सामील होणार आहे. चेन्नई आणि राजस्थान रॉयल्समध्ये या व्यापाराची डील पूर्ण झाली आहे. संजूसोबत, सीएसके रविंद्र जडेजा आणि सॅम करनला ट्रेड करणार आहे.
चेन्नई राहुल त्रिपाठी, शेख रशिद, वंश बेदी, उर्विल पटेल, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, दीपक हुड्डा आणि विजय शंकर यांना ऑक्शनपूर्वी रिलीज करण्याचा निर्णय घेऊ शकते. दीपक आणि विजय शंकर दोघांचेच मागील सीजनमधील प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिले होते. तसेच, राहुलही काही खास प्रभाव पाडण्यात यशस्वी झाला नाही.
Comments are closed.